मी बंडोजीराव म्हणजे बंड्या, आज बंड्याने अनेक मेसेज वाचले, पण एक सवाल मनात आला, राजकारणाचं काय, निवडणुका येतील आणि जातील पण व्हॉटस ऍपवर महाराष्ट्राची मानहानी का?
अरे कुठं नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र आणि त्यावर व्हॉटस ऍपवर येणारे जोक्स वाचून एकच काय, तर महाराष्ट्राची मानहानी.
लक्षात ठेवा या राज्याने अनेकांना मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. व्हॉटस ऍपवरील विनोदापायी बदनामी कशाला?
एखादं राज्य विकासात पुढे जाणं, किंवा मागे राहणं हे राज्यकर्त्यांवरच अवलंबून नसतं, तर तेथील जनतेवर ते ठरतं असतं, आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या कष्टाने महाराष्ट्राला विकासात मागे पडू दिलेलं नाही.
महाराष्ट्र नंबर वन असेल तर याचं श्रेय जनतेला आणि नसेल तर याला जबाबदारही आपणच आहोत.
या मायभूमीने रोजगार दिले आहेत, नव्या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिला आहे. अनेकांच्या जीवनात बदल आणले आहेत.
महाराष्ट्रात आजही अनेक मोठ्या कंपन्या आहेत, त्या शेजारील राज्यात अजूनही नाहीत, तुमचं राजकारण तुमच्या जवळ पण महाराष्ट्राची ही मानहानी नको.
आमच्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागली आहे, याचा आरोप करतांना आमची लोकसंख्येचाही विचार करा.
या राज्यात आश्रयाला आली शेजारील राज्यांना अनेक गोष्टी दिल्या. या राज्यात आजही एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांनी शेजारील राज्यांकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही.
या राज्यात अनेक थोर व्यक्ती जन्माला आल्या, या राज्याला इतिहासही तेवढाच मोठा आहे.
तेव्हा तुमच्या राजकारणाचं कायबी करा, पण आमच्या राज्याची बदनामी नको..सांगून ठेवतो, तुमचाच बंडोजीराव !
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.