नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये होणारी सभा रद्द कऱण्यात आली आहे, ही सभा आज रात्री साडेआठ वाजता आयोजित करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे ग्राऊंडवर पाणी साचल्याचं कारण सांगितलं जातंय.
ही सभा सध्या रद्द झाल्याचं सांगण्यात येत असलं, तरी पुढच्या टप्प्यात ही सभा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नरेंद्र मोदी यांची नाशिकमधील सभा अतिशय महत्वाची मानली जात होती. नरेंद्र मोदी कांद्यांची आयात निर्यात यावर काय बोलतात, त्यांची काय भूमिका आहे, याकडे शेतकऱ्यांसह संपूर्ण, नाशिक जिल्हा आणि खानदेशाचं लक्षं लागून होतं.
नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये, कांद्याचे भाव कमी झाल्याने मोठी नाराजी आहे. कापसाचे भावही यंदा कमी असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला निवडणुकीत भाजपला सामोरं जावं लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.