नितीन गडकरींवर पुण्यात बूट फेकण्याचा प्रयत्न

नितीन गडकरी यांच्यावर पुण्यातील कोथरुड येथील सभेत एका व्यक्तीनं बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधीत व्यक्तीला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असून, ती व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे. 

Updated: Oct 7, 2014, 06:54 AM IST
नितीन गडकरींवर पुण्यात बूट फेकण्याचा प्रयत्न title=

पुणे: नितीन गडकरी यांच्यावर पुण्यातील कोथरुड येथील सभेत एका व्यक्तीनं बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधीत व्यक्तीला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असून, ती व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे. 

तसंच बुट फेकणारी व्यक्ती नशेत असल्याचं सांगण्यात येत आहे. कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरींची जाहीर सभा होती. यावेळी अज्ञातानं गडकरींवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, गडकरींनी कालच येणारी लक्ष्मी नाकारू नका, असं म्हणत उमेदवारांकडून पैसे घेण्यासाठी एकप्रकारे प्रोत्साहन दिलं होतं. हरामाचा पैसा बाहेर पडण्याची हीच वेळ आहे, अशी पुष्टी त्याला गडकरींनी जोडली होती. मात्र निवडणूक आयोगानं त्यावर आक्षेप घेत, त्यांना नोटीस धाडली आहे. त्यानंतर आज पुण्यात गडकरींवर बूटफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.