मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात आता नेहरू, गांधींचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हरियाणातील हिस्सारला सभा झाली. भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता यांच्या निवडणूक प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी बोलतांना मोदींनी स्वच्छ भारत अभियान पुढं नेत येत्या १४ नोव्हेंबरपासून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंती निमित्त स्वच्छतेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन केलंय. चाचा नेहरूंच्या जयंतीपासून १९ नोव्हेंबर इंदिरा गांधींच्या जयंतीपर्यंत हे अभियान राबवण्याचं त्यांनी आवाहन केलं. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे, स्वच्छतेबद्दल जागरूक करावं, असं मोदी म्हणाले. 

Updated: Oct 6, 2014, 03:37 PM IST
मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात आता नेहरू, गांधींचा समावेश title=

हिस्सार, हरियाणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हरियाणातील हिस्सारला सभा झाली. भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता यांच्या निवडणूक प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी बोलतांना मोदींनी स्वच्छ भारत अभियान पुढं नेत येत्या १४ नोव्हेंबरपासून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंती निमित्त स्वच्छतेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन केलंय. चाचा नेहरूंच्या जयंतीपासून १९ नोव्हेंबर इंदिरा गांधींच्या जयंतीपर्यंत हे अभियान राबवण्याचं त्यांनी आवाहन केलं. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे, स्वच्छतेबद्दल जागरूक करावं, असं मोदी म्हणाले. 

भाषणात मोदींनी हरिणाच्या हुड्डा सरकारवर टीकास्त्र सोडलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या प्रोजेक्टसाठी आचारसंहिता बाजूला सारत त्यांनी परवानगी दिलीय. निवडणूक आयोगानं याकडे लक्ष द्यावं, अशी मागणीही मोदींनी केली. 

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हिस्सार रॅली 

  • डॉ. कमल गुप्ता यांच्या प्रचारार्थ सभा

  • आशियाई खेळांमध्ये चांगलं प्रदर्शन करणाऱ्या हरियाणाच्या खेळाडूंचं पंतप्रधानांनी केलं अभिनंदन...

  • महाराजा अग्रसेन यांच्या भूमिला नमन करून भाषणाला सुरुवात

  • ही लोकशाही आहे, २५ वर्षात इथं प्रत्येकानं आपल्या कुटुंबाचं दुकान चालवलं 

  • हरियाणाला परिवारशाहीतून मुक्त करा

  • मला जेलमधून समर्थनाची गरज नाही, गुंडांचं समर्थन नकोय... जनतेनं समर्थन दिलंय...

  • हरिणाचा विकास करण्यासाठी भाजप निवडणूक लढवत आहे....

  • भाजप उमेदवार डॉ. कमल गुप्तांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसनं 'कमल' नावाच्या दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अपक्ष म्हणून उभं केलंय...

  • हुड्डा सरकारनं रॉबर्ट वढेरा यांच्या प्रोजेक्टबद्दल दिलेल्या मंजूरीवर मोदींचा आक्षेप... निवडणूक आयोगाकडे आचार संहिता भंग असल्याची चौकशी करण्याची मागणी...

  • भाजपनं रेल्वे बजेटमध्ये हिस्सारला २ नव्या रेल्वे लाइन दिल्या आहेत...

  • चाचा नेहरूंच्या १४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत १२५व्या जन्मदिवशी स्वच्छ अभियानांतर्गत लहान मुलांसाठी स्वच्छतेचं अभियान... 

  • चाचा नेहरूंना श्रद्धांजली देण्यासाठी शाळांमध्ये, आंगणवाडीमध्ये लहान मुलांना, विद्यार्थ्यांना आरोग्य, स्वच्छतेचे धडे द्या... पाठ शिकवा... काँग्रेसच्या नेत्यांनाही अभियानासाठी आयोजन

  • १४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर पाच दिवसांचं विद्यार्थ्यांसाठी अभियान

  • १४ नोव्हेंबर चाचा नेहरू आणि १९ नोव्हेंबर इंदिरा गांधींचा जन्मदिवस

  • सैनिकांसाठी वन रँक पेन्शन योजना

  • हरियाणात मुलींच्या प्रमाणावर मोदींचं भाष्य

  • म्हणाले मुलींचं गर्भापासून रक्षण करा

  • मुलींना आईच्या गर्भात मृत होऊ देणार नाही

  • मुलींवरील सामूहिक बलात्काराच्या घटनांवरून काँग्रेस सरकारवर टीका

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.