‘बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचं टक्कल’- आठवले

माझ्या हातात सत्ता द्या, राज्याच सोनं करुन दाखवतो असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला, अशी टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होतील की नाही याची खात्री नसताना ते मला उपमुख्यमंत्रीपद कसं काय देणार असं म्हणत आठवलेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

Updated: Oct 6, 2014, 06:06 PM IST
‘बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचं टक्कल’- आठवले title=

लोणावळा: माझ्या हातात सत्ता द्या, राज्याच सोनं करुन दाखवतो असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला, अशी टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होतील की नाही याची खात्री नसताना ते मला उपमुख्यमंत्रीपद कसं काय देणार असं म्हणत आठवलेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

लोणावळा इथं भाजप उमेदवारासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी प्रचार सभा घेतली. या सभेत रामदास आठवले यांनी राज ठाकरेंचा त्यांच्या शैलीत खिल्ली उडवली. 

‘मी बेडुक उड्या मारत नाही तर ढाण्या वाघासारखी उडी मारतो, बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचा टक्कल’ असं सांगत आठवलेंनी ठाकरेंची खिल्ली उडवली. बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत आलो असं आठवलेंनी सांगितलं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघंही मुस्लिमविरोधी नाही असंही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.