राज्यात ६४ टक्के मतदान - निवडणूक आयोग

राज्यात ६४ टक्के मतदान - निवडणूक आयोग

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात, सुमारे 64 टक्के मतदानाची नोंद झालीय. सहा वाजेपर्यंत 62 टक्क्याच्या आसपास मतदान होईल, असा प्राथमिक अंदाज केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केला होता.

Oct 15, 2014, 07:33 AM IST
धनंजय मुंडे X पंकजा मुंडे; विजय कुणालाही सोपा नाही

धनंजय मुंडे X पंकजा मुंडे; विजय कुणालाही सोपा नाही

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आलं, मात्र पुतणे धनंजय मुंडे यांची मीडियात फारशी चर्चा होतांना दिसत नाहीय. 

Oct 14, 2014, 09:11 PM IST
शहरातला मतदारच ठरवणार विधानसभेचा कौल?

शहरातला मतदारच ठरवणार विधानसभेचा कौल?

 लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरुन दान टाकलं. नव मतदारांची ताकद काय असते, तेही याच निवडणुकीनं दाखवून दिलं.  आता पुन्हा विधानसभेचा कौल कुणाच्या हातात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची चावी शहरी मतदाराच्या हाती दिसत आहे. शहरातला मतदारच ठरवणार विधानसभेचा कौल, निवडणूक जिंकण्याचा नवा मंत्र, शहरांकडे चला ! , असाच दिसतोय.

Oct 14, 2014, 08:28 PM IST
होय मी मुख्यमंत्री होणार - उद्धव ठाकरे

होय मी मुख्यमंत्री होणार - उद्धव ठाकरे

होय मी मुख्यमंत्री होणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी म्हटलं असल्याचं सामनाचे संपादक संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Oct 14, 2014, 07:08 PM IST
नागपूर: शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा!

नागपूर: शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा!

निवडणूक रणधुमाळीत युती तुटल्यानंतर वारंवार भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना नेते सोडत नाहीयत. पण भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात चक्क शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपनं पाठिंबा दिलाय. 

Oct 14, 2014, 06:48 PM IST
सोलापूरमध्ये राष्ट्रवादी नेत्याचा खून, कडेकोट बंदोबस्तात वाढ

सोलापूरमध्ये राष्ट्रवादी नेत्याचा खून, कडेकोट बंदोबस्तात वाढ

सोलापूरच्या संवेदनशील असलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी नेत्याचा खून झाल्याने येथे कडेकोट बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या खूनामुळे येथे निवडणुकीला गालबोट लागले आहे.

Oct 14, 2014, 06:23 PM IST
आदर्श प्रकरणी दोषी माजी मुख्यमंत्र्यांना पाठिशी घातले – रुडी

आदर्श प्रकरणी दोषी माजी मुख्यमंत्र्यांना पाठिशी घातले – रुडी

आदर्श घोटाळ्य़ात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण हे तिघे माजी मुख्यमंत्री दोषी असल्याची कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचं भाजपनं सांगितलंय. जर हे तिघे दोषी होते तर मग कारवाई का केली नाही असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. 

Oct 14, 2014, 06:10 PM IST
निवडणुकीची माहिती मोबाईल अॅपवर

निवडणुकीची माहिती मोबाईल अॅपवर

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? मतदान केंद्र कुठलं. ही सगळी माहिती आता मोबाईलच्या अॅपमध्ये उपलब्ध झाली आहे.

Oct 14, 2014, 05:33 PM IST
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ३ उमेदवार

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ३ उमेदवार

महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात १ हजार ३५६ उमेदवार उतरले आहेत, जय पराजय तर १५ ऑक्टोबर रोजी ठरणार आहे. यात अनेक उमेदवार फक्त करोडपती नाहीत तर अरबपती आहेत. यातील टॉप टू उमेदवार देशातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपमधून आहेत, तिसऱ्या नंबरवर आहेत, समाजवादी पार्टीचे अबू आझमी.

Oct 14, 2014, 05:25 PM IST
पाहा... कशासाठी निवडून देतो आपण 'आमदार'

पाहा... कशासाठी निवडून देतो आपण 'आमदार'

बुधवारी, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे... अर्थातच, तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्यासाठी नक्कीच जाणार असाल... या कर्तव्यासोबतच तुम्ही निवडून दिलेला आमदार त्याची कामं योग्य पद्धतीनं करतोय की नाही, यावर लक्ष ठेवणं... हीदेखील तुमची जबाबदारी आहे. 

Oct 14, 2014, 05:12 PM IST
नावात काय आहे ?, साम्य असलेले अनेक उमेदवार रिंगणात

नावात काय आहे ?, साम्य असलेले अनेक उमेदवार रिंगणात

 नावात काय आहे ? असं म्हटलं  जातं.. पण जर तुम्ही निवडणुकीला उभे असालं तर नावात खूप काही आहे. नामसाधर्म्यामुळं तुम्ही निवडणूकीत पराभूतही होऊ शकता. लोकसभा निवडणूकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे श्रीवर्धनमधून उभे होते.  त्यांच्याच नावाच्या एका अपक्ष उमेदवाराला दहा हजार मतं मिळाली आणि सुनील तटकरेंचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळं सारख्याच नावाच्या उमेदवारांनी निवडणुकीचं पारडं फिरुही शकतं.

Oct 14, 2014, 05:04 PM IST
चव्हाण, पवार, फडणवीस, तावडेंची उमेदवारी रद्द करा - शिवसेना

चव्हाण, पवार, फडणवीस, तावडेंची उमेदवारी रद्द करा - शिवसेना

देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, अजित पवार हे सर्वजण उमेदवार असूनही पक्षाच्या जाहिरातींवर त्यांचा फोटो आहे. त्यामुळं या जाहिरातींच्या खर्चाचा उमेदवारांच्या खर्चात समावेश करावा आणि हा खर्च २८ लाखांपेक्षा अधिक असल्यानं त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

Oct 14, 2014, 05:03 PM IST
सिंधुदुर्गात राडा, काँग्रेस नेत्याच्या बाईक जाळल्या

सिंधुदुर्गात राडा, काँग्रेस नेत्याच्या बाईक जाळल्या

 सिंधुदुर्गात मतदानाच्या आदल्या दिवशी गालबोट लागलंय. काँग्रेसचे सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष संजू सावंत यांच्या बाईक्स आज पहाटे अज्ञातांनी जाळल्यायत. यासंदर्भात परब यानी सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय.

Oct 14, 2014, 04:51 PM IST
८० लाख प्रकरणी उमेदवाराला अटक आणि जामीन

८० लाख प्रकरणी उमेदवाराला अटक आणि जामीन

 ८० लाखांच्या रोकड प्रकरणात अमळनेरचे अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना अटक  करण्यात आली आहे. चौधरी यांना या गुन्ह्यात सह आरोपी म्हणून अमळनेर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौधरी यांना १८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Oct 14, 2014, 04:30 PM IST
मतदान करा महाराष्ट्र घडवा... सेल्फी पाठवा

मतदान करा महाराष्ट्र घडवा... सेल्फी पाठवा

 मतदान हे श्रेष्ठदान आहे, मतदान करून योग्य उमेदवाराला संधी दिल्यास तुमचा आणि तुमच्या भागाचा उत्कर्ष होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदान केले पाहिजे. 

Oct 14, 2014, 01:51 PM IST
'भाजप'चं 'ढोंग'समोर आणण्यात महाराष्ट्र हित

'भाजप'चं 'ढोंग'समोर आणण्यात महाराष्ट्र हित

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाने आपल्या संपादकीयमधून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपचं ढोंग जनतेसमोर आणण्यात महाराष्ट्र हित असल्याचं सामनाने म्हटलंय. भाजपने लग्न बारशात पितृपक्षाचे जेवण भरकरण्यासारखे ढोंग सुरू केले असल्याच सामन्यात म्हटलंय.

Oct 14, 2014, 01:45 PM IST
मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज, मुंबईत ४० हजार पोलीस तैनात

मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज, मुंबईत ४० हजार पोलीस तैनात

महाराष्ट्राच्या विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झालंय. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणेचं जास्त लक्ष असेल. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी अवैध दारू आणि मतदारांना वाटण्यात येणाऱ्या काळ्या पैशावरही निवडणूक आयोगाचं लक्ष आहेच, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नितीन गद्रे यांनी दिलीय. मतदार यादीत नाव असेल तरच मतदारांना मतदान करता येईल. मतदारांना याबाबत अधिक माहिती हवी असल्यास मतदारांनी १९५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गद्रे यांनी केलंय.  

Oct 14, 2014, 01:29 PM IST
पैसे वाटपाच्या संशयावरून गाडीची तोडफोड

पैसे वाटपाच्या संशयावरून गाडीची तोडफोड

अमळनेर तालुक्यात नंदगावात एका अपक्ष उमेदवाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. 

Oct 14, 2014, 01:05 PM IST
'मनसे यापुढे लोकसभा लढवणार नाही'

'मनसे यापुढे लोकसभा लढवणार नाही'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुढे लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला आतापर्यंत लोकसभेत यश मिळालेलं नाही, हे या मागचं कारण नक्कीच नाही. कारण राज ठाकरे यांनी या मुद्यावर मत माडलं आहे.

Oct 14, 2014, 12:14 PM IST
राज्यातील निवडणुकीच्या ठळक बाबी...

राज्यातील निवडणुकीच्या ठळक बाबी...

बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान होतंय. यंदा तब्बल ४११९ उमेदवारी रिंगणात आहेत... तसंच, राज्यातील पाचही महत्त्वाच्या पक्षांची ताकद पणाला लागलीय...  आणि म्हणूनच पोलिसांचीही जबाबदारी वाढलीय. 

Oct 14, 2014, 11:53 AM IST