महाराष्ट्रातही भाजपला बहुमत द्या : राजनाथ सिंह

केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह हे महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. फक्त केंद्रातच नव्हे तर राज्यातही बहुमत असणे गरजेचे आहे, म्हणून महाराष्ट्रातही भाजपला बहुमत द्या, कारण भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

Updated: Oct 9, 2014, 05:06 PM IST
महाराष्ट्रातही भाजपला बहुमत द्या : राजनाथ सिंह title=

सांगली :केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह हे महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. फक्त केंद्रातच नव्हे तर राज्यातही बहुमत असणे गरजेचे आहे, म्हणून महाराष्ट्रातही भाजपला बहुमत द्या, कारण भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने चार महिन्यात महागाई रोखण्याचं काम केल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी यावेळी केला आहे. पेट्रोलच्या किंमती अजून कमी होणार असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीने केवळ सत्तेच सुख भोगण्यासाठी सरकार बनवलं होतं, असा आरोपही यावेळी राजनाथ सिंह यांनी केला आहे.

पाकिस्तानकडून जरी शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असलं, तरी बीएसएफचे जवान पाकिस्तानला सडेतोड उत्तर देतील, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. मी सर्व जाहीरपणे सांगू शकत नाही, पण थोड्याच दिवसात सर्वांना कळेल काय कारवाई सुरू आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.