मुंबई : स्टाफ सिलेक्शन परिक्षांचा आणखी एक गोंधळ समोर येतोय, यामागे मराठी मुलांना स्पर्धेतून बाजूला करण्याचा हा केंद्र सरकारचा डाव असल्याचं म्हटलं जातंय. कारण विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचं परीक्षा केंद्र निवडल्यानंतरही विद्यार्थ्यांना दूरची केंद्र दिली जात आहेत.
पुण्याच्या मुलांना गोव्याचं परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे, तर मुंबईच्या मुलांना चंद्रपूर परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे. मुंबईहून चंद्रपूरला २० तासांचा प्रवास आहे, तसेच खर्च आणि वेळेच्या तुलनेत हे परवडणारे नसल्याचं म्हटलं जात आहे.
विद्यार्थ्यांसमोर अशा अडचणी येत असल्याने परिक्षेला न जाण्याचं प्रमाण वाढणार आहे, आणि मराठी मुलं स्पर्धेतून बाहेर होणार असल्याची मोठी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.