भिवंडी : शहरात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे संकेत दिले आहेत. वेळ आली तर मी सरकारचा कारभार मागे उभा राहून हाकणार नाही, तर आत येऊन हाकेन, असं त्यांनी जाहीर सभेत म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर राज ठाकरे यांनी राहता कुठे आणि लढवता कुठे, असा टोमणा मारला होता, त्यावर उत्तर देतांना विनोद तावडे यांनी म्हटलं होतं, मी फक्त जाहीर नाही करत तर मी निवडणूक लढवतो, असा पलटवार तावडेंनी केला होता.
राज ठाकरे यांनी या पलटवाराला उत्तर म्हणून वेळ आली तर मी सरकारचा कारभार हाकण्यासाठी मागे उभा राहणार नाही, तर आत येऊन कारभार हाकेन हा संकेत दिला आहे. यावरून राज ठाकरे यांनी वेळ आली तर आपण मुख्यमंत्रीपद भषवू, असे संकेत दिले असल्याचं सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.