shiv sena

'बंडोबांना थंड करु, थंड झाले नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवू'

शिवसेनेतल्या बंडोबांना थंड करु. थंड झाले नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा दिलाय शिवसेना नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी दिला आहे.

Feb 4, 2017, 08:20 PM IST

भाजपला मोठा धक्का, घाडीगावकर यांचा उमेदवारी अर्ज बाद

पालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने केलेल्या तक्रारीनंतर भाजपच्या मोठ्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

Feb 4, 2017, 07:09 PM IST

दादरमध्ये शाखाप्रमुख घराणेशाहीला कंटाळे, अपक्ष लढणार

 दादरमध्ये शिवसेनेत सुरू असलेल्या घराणेशाहीला कंटाळून माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांनी अपक्ष अर्ज भरण्याची तयारी केलीय. 

Feb 4, 2017, 12:07 AM IST

सायनमध्ये शिवसेनेत बंडखोरी...

 सायन प्रतीक्षानगरमध्ये प्रभाग क्रमांक 173 मधून शिवसेननं प्रल्हाद ठोंबरेंना उमेदवारी दिलीय.  त्यामुळे नाराज उपशाखाप्रमुख सुनिल शेट्टे यांनी बंडखोरी केलीय. 

Feb 3, 2017, 11:47 PM IST

शिवसेनेचा नाना आंबोलेंना राणे, राज ठाकरेंचा दाखला

शिवसेना बंडखोरी थोपविण्यात यशस्वी होईल, असा दावा करताना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपमध्ये दाखल झालेल्या नाना आंबोलेंना जोरदार टोला लगावलाय. जे सेनेतून बाहेर गेलेत, त्यांचे काय होते, हे राणे, राज ठाकरेंवरुन लक्षात घ्या, असा दाखला दिला.

Feb 3, 2017, 08:10 PM IST

शिवसेना नेतृत्वाची कसोटी, अनेकांची समजूत तर काहींची बंडखोरी

मुंबई पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने शिवसेनेपुढे तिकिट कोणाला द्यायचा याचा पेच निर्माण झाला. शिवसेना नेतृत्वाने काहींची समजूत काढण्यात यश मिळवले. तर काहींना तिकिट न मिळ्याल्याने अधिकृत उमेवारांविरोधात दंड थोपटत बंडखोरी केली आहे. 

Feb 3, 2017, 07:30 PM IST

नागपूरच्या उमेदवारी यादीवर घराणेशाहीची छाप

संकेत फुके हे भाजपचे विधान परिषद् आमदार परिणय फुके यांचे लहान बंधू आहेत. तर आमदार प्रकाश गजभिये यांच्या पत्नी सुजाता राष्ट्रवादीतून निवडणुक लढवणार आहेत. 

Feb 3, 2017, 07:23 PM IST

नाशिकमध्ये निवडणूक तिकीट वाटपावरून शिवसेनेत राडा

महानगर पालिका निवडणूक तिकीट वाटपावरून शिवसेनेत आज चांगलच राडा झाला. माजी महापौर विनायक पांडे यांच्या मुलाला उमेदवारी नाकारल्याने संतप्त पांडे समर्थकांनी महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांना बेदम मारहाण केली.

Feb 3, 2017, 06:48 PM IST

शिवसेनेची दक्षिण मुंबईतील उमेदवार यादी जाहीर

 आता शिवसेनेने दक्षिण मुंबई शिवसेना उमेदवार यादी जाहीर केली आहे. 

Feb 2, 2017, 08:21 PM IST

अजित पवार कडाडले, भाजपवर हल्लाबोल तर सेनेवर गंभीर आरोप

केंद्रातील नरेंद्र आणि राज्यातील देवेंद्र सरकारवर लक्ष्य करत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात केली. यावेळी युतीवर जोरदार हल्लाबोल केला.

Feb 2, 2017, 07:32 PM IST

शिवसेनेत बंडाळी... हे आहेत बंडोबा....

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याची वेळ जशी जवळ येतेय, तसतशी पक्षांमध्ये नाराजी आणि बंड उफाळून आलंय...मुंबईत शिवसेनेत सकाळपासून तीव्र नाराजी पसरलीय. दादर, वडाळा, लालबाग-परळ भागातल्या शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी पसरलीय.  दादार, वडाळाल्यात शिवसेनेच्या शाखांना टाळी ठोकण्यात आलीय. तर काही महत्वाच्या नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय.

Feb 2, 2017, 07:28 PM IST

ठाण्यात यांनी भरले शिवसेनेकडून फॉर्म....

ठाण्यातून शिवसेनेकडून फॉर्म भरण्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. 

Feb 2, 2017, 06:58 PM IST

बंडखोर विरूद्ध निष्ठावंत शिवसैनिक सामना, नाराजांना 'मातोश्री' वर पाचारण

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार झटका बसलाय. शिवसेनेच्या तिघा ज्येष्ठ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्याशिवाय ठिकठिकाणी शिवसेनेला बंडखोरीनं ग्रासलं असून, बंडोबांना थंडोबा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानिमित्त बंडखोर विरूद्ध निष्ठावंत शिवसैनिक असा सामना सुरू झालाय.

Feb 2, 2017, 06:35 PM IST

भाजपला टक्कर देण्यासाठी मुलुंडमध्ये शिवसेनेची खेळी

मुलुंडमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप असा संघर्ष होणार आहे. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो. मात्र, खासदार किरीट सोमय्या यांनी शह देण्यासाठी शिवसेनेने गुजराती कार्डचा वापर केलाय.

Feb 2, 2017, 05:37 PM IST