शिवसेनेची दक्षिण मुंबईतील उमेदवार यादी जाहीर

 आता शिवसेनेने दक्षिण मुंबई शिवसेना उमेदवार यादी जाहीर केली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2017, 08:24 PM IST
शिवसेनेची दक्षिण मुंबईतील उमेदवार यादी जाहीर title=

मुंबई : शिवसेनेत बंडाळीने उचल घेतली आहे. काहींना उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा फडकवलाय तर काहींनी भाजपचा रस्ता धरला. आता शिवसेनेने दक्षिण मुंबई शिवसेना उमेदवार यादी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपकडून अद्याप यादीच जाहीर झालेली नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची यादी जाहीर झाली आहे.

आज मुंबईत 456 जणांनी उमेदवारी अर्ज भरले. तर आतापर्यंत एकूण  622 जणांनी अर्ज भरलेत आहेत.

दक्षिण मुंबई शिवसेना उमेदवार यादी

२१३ - सुनील कदम
२१४ - अरविंद बने
२१५ - अरुंधती दुधवडकर
२१६ - राजेश आवळेगावकर
२१७ - युगंधरा साळेकर
२१८ - मीनल जुवाटकर
२१९ - दुर्गा शिंदे
२२० - सुरेंद्र बागलकर
२२१ - कन्हैयालाल रावल 
२२२ - मीनाताई कांबळी 
२२३ - आशा मामेडी 
२२४ - विजयश्री साखरे 
२२५ - सुजाता सानप 
२२६ - स्मिता पवळे 
२२७ - अरविंद राणे