Gold Discovery in China : जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा अमेरिकेकडे आहे. मात्र, लवकरच चीन अमेरिसह बरोबरी करणार आहे. चीनमध्ये दोन महिन्यात दुसऱ्यांदा सोन्याची मोठी खाण सापडली आहे. चीनमध्ये नव्याने सापडलेला सोन्याचा साठा 168 टनांवर पोहोचला आहे. हा सोन्याचा खजिना चीनचे अर्थव्यवस्थेला बळ देणार आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये चीनमध्ये पृथ्वीवरील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली (World’s largest gold reserve) . चीनमध्ये सापडलेला हा सोन्याचा साठा पाहून अमेरिकेसारखा गडगंज देशही हडबडला. चीनमधील पिंग्झियांग काउंटी येथे ही सोन्याची खाण सापडली होती. हुनान प्रांताच्या जिओलॉजिकल ब्युरोने सोन्याची खाण सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा होता. इतकचं नव्हे तर चीनच्या सरकारी माध्यमांनी देखील याची पुष्टी केली होती.
चीनमधील पिंग्झियांग काउंटी येथे जमिनीखाली 40 गोल्डन व्हेन अर्थात सोन्याच्या धारा सापडल्या होत्या. हा संपूर्ण साठा एकत्र केला तर या ठिकाणी सुमारे 1,000 मेट्रिक टन उच्च दर्जाच्या खनिजाचा साठा आहे. या सोन्याच्या खाणीचे मूल्य 600 अब्ज युआन म्हणजेच भारतीय चलनात जवळपास 6 लाख 76 हजार कोटी रुपये इतकी वर्तण्यात आले. हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असू शकते असा दावा करण्यात आला. कारण दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण डीप माइनमध्ये 930 पेक्षा जास्त मेट्रिक टन सोनं सापडले होते.
यानंतर नविन वर्षता पुन्हा एकदा चीनमध्ये सोन्याची मोठी खाण सापडली आहे. भूवैज्ञानिक सर्वेक्षणात उत्तर-पश्चिम चीनमधील गान्सू प्रांत, उत्तर चीनमधील इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेश आणि ईशान्य चीनच्या हेलोंगजियांग प्रांतात सोन्याचा साठा आढळून आला आहे. चीनी वेबसाइट ग्लोबल टाईम्सने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे. नव्याने सापडलेल्या सोन्याच्या संसाधनांची एकूण रक्कम 168 टन असल्याचे सांगण्यात आले आहे. गांसूमध्ये सर्वाधिक 102.4 टन सोने सापडले आहे. चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे.