भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात मिळालं नाही स्थान, DSP सिराजने घेतला मोठा निर्णय

Mohammad Siraj :   भारतीय संघात सिराजचं नाव नसल्याने सर्वचजण आश्चर्यचकित होते. आता टीम इंडियातून ड्रॉप केल्यावर गोलंदाज मोहम्मद सिराजने मोठा निर्णय घेतला आहे

पुजा पवार | Updated: Jan 20, 2025, 11:34 AM IST
भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात मिळालं नाही स्थान, DSP सिराजने घेतला मोठा निर्णय  title=
(Photo Credit : Social Media)

Mohammad Siraj : आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी बीसीसीआयने शनिवारी टीम इंडियाची घोषणा केली. 15 सदस्यीय संघात अनेक दिग्गज तसेच युवा स्टार खेळाडूंचा समावेश करण्यात आला. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची निवड करण्यात आली नाही. भारतीय संघात सिराजचं नाव नसल्याने सर्वचजण आश्चर्यचकित होते. आता टीम इंडियातून ड्रॉप केल्यावर गोलंदाज मोहम्मद सिराजने मोठा निर्णय घेतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच इंग्लंड विरुद्ध वनडे आणि टी 20 सीरिजमध्ये टीम इंडियात संधी मिळाली नसल्याने सिराज आता 30 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या हैदराबाद विरुद्ध विदर्भ रणजी ट्रॉफी सामन्यात खेळू शकतो. 

कधी सुरु होणार रणजी सामने? 

रणजी ट्रॉफीचा दुसरा भाग हा 23 जानेवारीपासून सुरु होईल. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने सांगितले की, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 30 जानेवारीला विदर्भ विरुद्ध होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकतो. रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुपच्या पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबाद पाच सामन्यात नऊ अंकांनी सहाव्या स्थानावर आहे. 23 जानेवारीला होणार देशांतर्गत सामना खेळून रणजी ट्रॉफीला पुन्हा सुरुवात करेल. 

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष काय म्हणाले? 

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्ष जगन मोहन राव म्हणाले की, 23 जानेवारीच्या सामन्यासाठी सिराज उपलब्ध असेल कि नाही हे मला माहीत नाही. राव म्हणाले की, सिराज हैदराबादसाठी पुढील रणजी ट्रॉफी सामना खेळण्याची शक्यता आहे, जिथे त्यांचा सामना 30 जानेवारी रोजी नागपूर सोबत होईल. 

हेही वाचा : Video : मॅच सुरु असताना मैदानावर आला साप, महिला खेळाडूने केलं असं काही पाहून सर्वच शॉक

टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार : 

काही दिवसांपूर्वी झालेल्या बीसीसीआयच्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये स्टार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे निर्देश देण्यात आले होते. बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं की ज्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळायचे आहे त्यांनी रणजी ट्रॉफीचे सामने खेळणे महत्वाचे आहे. त्यामुळे भारतीय वनडे आणि टेस्ट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सुद्धा आगामी रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघाकडून खेळणार आहे. या सोबतच रवींद्र जडेजा हा सौराष्ट्र, ऋषभ पंत हा दिल्ली, शुभमन गिल हा पंजाब संघाकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळेल. विराट कोहलीला दुखापत झाल्याने तो रणजी ट्रॉफीचा सामना खेळणार नाही. 

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षत पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा