भाजपला टक्कर देण्यासाठी मुलुंडमध्ये शिवसेनेची खेळी

मुलुंडमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप असा संघर्ष होणार आहे. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो. मात्र, खासदार किरीट सोमय्या यांनी शह देण्यासाठी शिवसेनेने गुजराती कार्डचा वापर केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2017, 05:37 PM IST
भाजपला टक्कर देण्यासाठी मुलुंडमध्ये शिवसेनेची खेळी title=

मुंबई : मुलुंडमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप असा संघर्ष होणार आहे. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो. मात्र, खासदार किरीट सोमय्या यांनी शह देण्यासाठी शिवसेनेने गुजराती कार्डचा वापर केलाय.

भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या मुलुंडमध्ये शिवसेने आज शक्तिप्रदर्शन करत आपल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरले. यावेळी गुजराती वोट काबीज करण्यासाठी शिवसेनेने वार्ड क्रमांक 108 मधून उमेश कारिया यांना उमेदवारी दिली आहे. 

भाजपाकडून या वार्ड मधून किरीट सोमय्या यांचा मुलगा निल सोमय्या याला उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे मुलुंडमध्ये पालिका निवडबुक प्रतिष्ठेची बनली आहे. या ठिकाणी भाजपला शहदेण्यासाठी शिवसेनेने जोरदार खेळी केली आहे.