Shahrukh Khan superhit movie: 90 च्या दशकातील गाणी आणि चित्रपट आवडत असतील, तर 'दीवाना' चित्रपटातील गाणं 'ऐसी दीवानगी देखी नहीं कभी' तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. शाहरुख खान, ऋषी कपूर आणि दिव्या भारती यांच्या दमदार अभिनय असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. एवढेच नाही तर या गाण्याने कित्येक रेकॉर्ड मोडले होते. प्रेक्षकांना हे गाणं खूप आवडलं होतं.
साल 1992 मध्ये जेव्हा ऋषी कपूर आणि दिव्या भारतीचा 'दीवाना' चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांनी याला खूप प्रेम दिलं. हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. चित्रपटाची पटकथा आणि गाणी खूप गाजली. 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16 कोटींची जबरदस्त कमाई केली.
सुपरहिट चित्रपटासाठी शाहरुख खान निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते. शाहरुख खानच्या भूमिकेसाठी सुरुवातीला सनी देओलला विचारण्यात आलं होतं, पण त्याने ही भूमिका नाकारली. सनी देओल यांच्या नकारानंतर शाहरुख खानची शिफारस धर्मेंद्र यांनी निर्मात्यांना केली होती. त्यानंतर शाहरुख यांना ही भूमिका ऑफर करण्यात आली. सुरुवातीला जेव्हा शाहरुख यांना हा चित्रपट ऑफर झाला, तेव्हा त्यांनीही नकार दिला होता.
सनीनंतर ही भूमिका अरमान कोहली यांना ऑफर करण्यात आली होती, असे देखील सागितले जाते. मात्र, निर्मात्या शबनम कपूर यांच्यासोबत अरमानच्या वैयक्तिक वादामुळे त्यांना चित्रपटातून वगळण्यात आलं होत. यानंतर निर्मत्या शबनम यांच्या समोर दुसरी अडचण उभी राहिली. 'ऐसी दीवानगी देखी नहीं कभी' या गाण्यामुळे शाहरुख खान आणि ऋषी कपूर यांच्यात वाद झाला होता.
हे गाणं 1990 च्या दशकातील प्रसिद्ध गायक विनोद राठोड यांनी गायलं होतं. हे गाणं शाहरुख खान आणि ऋषी कपूर यांच्या भांडणाचं कारण ठरलं. गायक विनोद राठोड 1990 च्या दशकात अनेक मोठ्या कलाकारांची आवाज बनले होते. त्याकाळी त्यांच्या गाण्यांची इतकी क्रेझ होती की प्रत्येक अभिनेता त्यांच्या आवाजात गाणी शूट करायला उत्सुक असायचा.
हे ही वाचाः अभिनेता शूटिंगसाठी न आल्याने क्रू मेंबर पोहोचले घरी, दरवाजा तोडून पाहिलं तर....; कुटुंबही धक्क्यात
शाहरुख खानही 'दीवाना' चित्रपटासाठी विनोद राठोडच्या आवाजातलं गाणं त्याच्यावर शुट व्हावं, असं म्हणत होते. पण ऋषी कपूर याला विरोध करत होते आणि ते म्हणत होते की हे गाणे माझ्यावर शूट करा. यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. अखेरीस, निर्मात्या शबनम यांनी हस्तक्षेप करून हे गाणं शाहरुखवर शूट करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट आणि त्याची गाणी दोन्ही सुपरहिट ठरले.