shiv sena

शिवसेनेचे चार मंत्री 'वर्षा' बंगल्यावर

 शिवसेनेचे चार मंत्री आज रात्री मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेले आहेत.  

Feb 8, 2017, 10:46 PM IST

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही - नारायण राणे

 शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, कारण एकदा वाघाच्या तोंडाला रक्त लागले तर तो साधे मासं खात नाही... त्यांना पैशाची चटक लागली आहे, त्यामुळे पाच वर्ष सत्तेचे रक्त पिणार असल्याने ते सत्ता सोडत नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी झी २४ तासच्या रणसंग्राम या कार्यक्रमात केला आहे. 

Feb 8, 2017, 06:35 PM IST

१८ फेब्रुवारीला शिवसेना खेळणार मोठी राजकीय खेळी?

 येत्या १८ फेब्रुवारी रोजी शिवसेना हुकमाचा एक्का टाकणार असून ही शिवसेनेची सर्वात मोठी राजकीय खेळी असेल असा दावा असणार मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. 

Feb 8, 2017, 06:00 PM IST

शिवसेनेचा हा बंडोबा थंडोबा नाही...

 वॉर्ड क्रमांक १९४ चे शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार महेश सावंत यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. 

Feb 8, 2017, 05:18 PM IST

मुंबई पालिका निवडणूक; शिवसेना-भाजपचे धर्मयुद्ध पेटले

करो या मरो या इराद्यानंच शिवसेना आणि भाजप मुंबई महापालिकेच्या रणमैदानात उतरले आहेत. शिवसेनेने थेट भाजपच्या सेनापतींनाच आव्हान दिले आहे. येत्या काळात हा सामना आणखी रंगतदार होणार आहे. 

Feb 7, 2017, 11:44 PM IST

मुंबईत या ठिकाणी बंडखोरीमुळे शिवसेनेची डोकेदुखी

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अनेक वॉर्डांमध्ये बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिलाय. 

Feb 7, 2017, 06:57 PM IST

भाजपचा जाहिरनामा म्हणजे खोदा पहाड निकला चुहां - शिवसेना

भाजपनं मुंबई महापालिकेसाठी जाहिरनामा प्रकाशित केलाय. यंदा हा जाहीरनामा स्टॅम्प पेपरच्या रुपात जनतेसमोर आणला. मात्र, या जाहिरनाम्यावर शिवसेनेने जोरदार टीका करताना खिल्ली उडवली आहे.

Feb 7, 2017, 04:28 PM IST

या दिग्गजांचे उमेदवारी अर्ज झाले बाद...

 ठाणे, पुणे आणि उल्हासनगर येथे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. अनेकांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने घऱी बसावे लागणार आहे. तर काही जणांचा एबी फॉर्म नामंजूर झाल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे. 

Feb 6, 2017, 06:21 PM IST

शिवसेनेच्या चारही उमेदवारांच्या एबी फॉर्मबाबत हरकत

 उमेदवार अर्ज छाननीत शिवसेनच्या पँनलला झटका बसला आहे. प्रभाग क्रमांक 30मधील शिवसेनेच्या चारही उमेदवारांच्या एबी फॉर्मला निवडणूक अधिका-यांनी हरकत घेतली आहे. उमेदवारांच्या एबी फॉर्मवर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी काळ्या रंगात स्वाक्षरी केल्यानं ही हरकत घेण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचं संपूर्ण पॅनलच अपक्ष ठरण्याची शक्यता आहे.

Feb 5, 2017, 08:58 AM IST

मुंबईचा विकास आम्ही करुन दाखवू - शरद पवार

मुंबईचा विकास आम्ही करुन दाखवू - शरद पवार

Feb 4, 2017, 09:34 PM IST

शरद पवारांचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल, मुंबईचा विकास आम्ही करुन दाखवू!

 महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी प्रचाराने आजपासून रंगू लागली आहे. राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मानखुर्दपासून सुरु झाला. यावेळी पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. त्याचवेळी शिवसेनेला टार्गेट केले. या दोघांची पालिकेत सत्ता आहे. मात्र, मुंबईकरांच्या समस्या कायम आहे. त्यांना दूर करा, असे आवाहन पवार यांनी मतदारांना केले.

Feb 4, 2017, 09:33 PM IST