मुंबईत साडीवाटप करताना कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले
संध्या दोशी यांच्या कार्यकर्त्यांना मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले आहे
Feb 13, 2017, 02:19 PM ISTमुंबई पालिकेवर भगवा फडकणारच : उद्धव ठाकरे
कोणी कितीही पारदर्शकतेचा विचार केला तरी आमची कामात पारदर्शकता आहे. जे (भाजप) हा मुद्दा मांडत आहेत, त्यांच्याकडे किती आहे, असा प्रश्न उपस्थित करुन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणारच, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वडाळ्यातील सभेत केला.
Feb 11, 2017, 09:42 PM ISTराज्य सरकारचा टेकू कधी काढणार याबद्दल बोलले उद्धव...
युती तुटली म्हणून मी सीएम झालो असे मुख्यमंत्री म्हणतात, पण आम्ही टेकू दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी परळ येथे झालेल्या सभेत लगावला.
Feb 10, 2017, 10:11 PM ISTअशोक चव्हाण यांची शिवसेनेवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2017, 08:13 PM ISTपक्षफुटीच्या भीतीमुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही : मा. गो. वैद्य
पक्षफुटीच्या भीतीमुळे शिवसेना राज्य सरकारमधून बाहेर पडणार नाही, असा अंदाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारप्रमुख मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केलाय.
Feb 10, 2017, 07:45 PM ISTशिवसेनेने पाठिंबा काढला तर नवा फॉर्म्युला सांगितला पृथ्वीराज चव्हाणांनी
शिवसेनेने राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर काय पर्याय असून शकतो यातील एक पर्याय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखविला.
Feb 10, 2017, 06:47 PM ISTभाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची लेखी तक्रार
शिवसेना खासदार अनिल देसाई यांची भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे दोन्ही पक्षात अधिकच ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Feb 10, 2017, 06:10 PM ISTजयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले...
बाळासाहेबांचे खरे गुण असतील आणि जर खरे वाघ असतील तर 23 तारखेला शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल, मात्र तसं झालं नाही तर ते कागदी वाघ हे सिद्ध होईल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलंय.
Feb 9, 2017, 11:00 PM ISTशिवसेना आमदार आणि शिवसैनिकात वाद, व्हिडिओ क्लीप व्हायरल
कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या दोन व्हिडिओ क्लीप वायरल झाल्यायेत. एका क्लीप मध्ये देसाई येथील नाराज शिवसैनिकांशी झालेला वाद आणि एका क्लीप मध्ये गावकरी आणि मनसेच्या उनेदावारांनी आमदार सुभाष भोईर यांना घेराव घातलाय.
Feb 9, 2017, 10:36 PM ISTसत्तेत राहून विरोध करण्याचे खऱे कारण सांगितले उद्धव ठाकरेंनी
आमच्यावर टीका होते की सत्तेत राहून विरोध का करतात. तर याचं खऱं कारण मी आज सांगतो असे सांगून आपल्या विरोधाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अंधेरीतील सभेत स्पष्ट केली.
Feb 9, 2017, 09:25 PM ISTभाजपने देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली : उद्धव ठाकरे
शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. संसदेत मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली होती. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला. काल मोदींनी मनमोहन सिंग यांनी रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला प्राप्त झाली असं म्हणाले. ते रेनकोट घालून आंघोळ तरी करतात मात्र तुम्ही तर देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली. केवळ साबणाचे बुडबुडे काढलेत. कारण ते पारदर्शक असतात.
Feb 9, 2017, 09:19 PM ISTत्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही - मुख्यमंत्री
आजकाल मी किती पाणी पितो तेही ते मोजतात, पण मी त्यांना या निवडणुकीत पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असा घणाघाती टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
Feb 9, 2017, 07:52 PM ISTभाजप सरकारमधून सेनेला हकलून देईल - पृथ्वीराज चव्हाण
राज्यात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंत्र्यांना कधीही हाकलून देतील, आता सत्तेला सुरुंग लागण्याची केवळ औपचारिकता बाकी असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय.
Feb 9, 2017, 07:15 PM ISTशिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर राज्य सरकारला इशारा, मुख्यमंत्र्यांचा दावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2017, 06:59 PM ISTनाशिकमध्ये मनसेची खेळी, शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी अशी युती
महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने मनसेने काही प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरु आहे.
Feb 9, 2017, 06:40 PM IST