'या' क्रिकेटरविरुद्ध अटक वॉरंट जारी, आहे कोट्यवधी रुपयांचे चेक बाऊन्सचे प्रकरण

हा खेळाडू पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला असून, कोट्यवधी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 20, 2025, 10:21 AM IST
'या' क्रिकेटरविरुद्ध अटक वॉरंट जारी, आहे कोट्यवधी रुपयांचे चेक बाऊन्सचे प्रकरण title=
Photo Credit: PTI

Arrest warrant against Shakib Al Hasan: बांगलादेश संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन (shakib al hasan) मागे एक झालं की एक गोष्ट येत आहे. त्याचा त्रास कमी होताना दिसत नाही. संशयास्पद गोलंदाजीमुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी घोषित करण्यात आलेल्या बांगलादेश संघात (bangladesh)  स्थान मिळाले नाही. आता बांगलादेश न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. या आधीही याच्यावर एक मोठी केस झाली. 2024 साली बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर साकिबने देश सोडला आणि आता तो परदेशात राहत आहे. कोट्यवधी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात आता त्याच्याविरुद्ध बांगलादेश न्यायालयाने अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

19 जानेवारीला हजर राहण्याचे होते आदेश 

15 डिसेंबर रोजी ढाका कोर्टात शकीब अल हसनच्या नावावर चेक बाऊन्स झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणावर 18 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर शाकिबला 19 जानेवारीला हजर राहण्याचा आदेश देण्यात आला. या आदेशाचे त्याने पालन केले नाही तो कोर्टात पोहोचला नाही. त्यानंतर ढाक्याचे अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट झियादुर रहमान यांनी 19 जानेवारी रोजी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. 

हे ही वाचा: बांगलादेशी प्रेक्षकांची घृणास्पद कृती...लाइव्ह मॅचदरम्यान केला हिंदू क्रिकेटरचा अपमान, Video Viral

 

काय आहे प्रकरण?

IFIC बँकेचे रिलेशनशिप ऑफिसर शाहिबुर रहमान यांनी बँकेच्या वतीने शाकिब विरुद्ध केस दाखल केली होती. शकीबआणि इतर तीन लोक 41.4 मिलियन  अर्थात बांगलादेशी टका  2.95 कोटी रुपये दोन वेगवेगळ्या चेकद्वारे ट्रान्स्फर करण्यात अयशस्वी झाले. या प्रकरणात शकीब व्यतिरिक्त त्याच्या कंपनी अल हसन ॲग्रो फार्म लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक गाझी शाहगीर हुसेन, संचालक इमदादुल हक आणि मलायकर बेगम यांची नावे आहेत.

हे ही वाचा: 46 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 5 तर परतायला 3, भारताची सगळ्यात स्लो ट्रेन तरीही तिकिटासाठी होतात भांडणे

 

शकीबसाठी बांगलादेशात परतणे अवघड 

सत्तापालट होण्यापूर्वी शेख हसीनाच्या सरकारमध्ये खासदार असलेल्या शकीब अल हसनवर देशात राजकीय गोंधळानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर शाकिबने देश सोडला होता. अशा स्थितीत आता शकीबला बांगलादेशात परतणे आता त्याच्यासाठी कठीण मानले जात आहे. 

हे ही वाचा: कशी दिसायची हुस्न की मल्लिका 'अनारकली'? सौंदर्यासाठी अकबराने तिला केले होते हॅरेममध्ये कैद

 

कसं आहे करियर? 

गेल्या वर्षी काऊंटी सामन्यादरम्यान त्याची गोलंदाजी संशयास्पद आढळली होती, त्यानंतर त्याने आतापर्यंत दोनदा गोलंदाजी ॲक्शन चाचणी दिली आहे, परंतु त्यापैकी एकाही सामन्यात त्याला क्लीन चिट मिळालेली नाही.