वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन दिले नव्हते : अमित शाह

भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन कधीही दिले नव्हते. तसेच वेगळ्या विदर्भ निर्मितीचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात उल्लेखही केलेला नाही, असे स्पष्टीकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विदर्भबाबत एका प्रश्नावर दिले.

PTI | Updated: May 27, 2015, 09:22 AM IST
वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन दिले नव्हते : अमित शाह title=

नवी दिल्ली : भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन कधीही दिले नव्हते. तसेच वेगळ्या विदर्भ निर्मितीचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात उल्लेखही केलेला नाही, असे स्पष्टीकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विदर्भबाबत एका प्रश्नावर दिले.

'राममंदिराची निर्मिती, समान नागरी कायदा करणे आणि ३७०वे कलम रद्द करणे या निर्णयासाठी सध्याचे बहुमत पुरेसे नसून, त्यासाठी ३७० जागांची गरज आहे, अशा शब्दांत अमित शाह यांनी हे महत्त्वाचे मुद्दे पक्षाने तूर्तास गुंडाळून ठेवल्याचे स्पष्ट केले. 

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप मुख्यालयात झालेल्या खास पत्रकार परिषदेमध्ये मोदी सरकारच्या कामगिरीची जंत्री मांडताना शाह यांनी पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले राममंदिर, समान नागरी कायदा आणि ३७०वे कलम हे विषय मार्गी लावण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागेल, असे सांगितले.

भाजपच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेताना कॉंग्रेस आणि 'यूपीए'च्या कार्यकाळाला त्यांनी लक्ष्य केले. गेल्या एक वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधकांना सरकारवर करता आलेला नाही, अशा शब्दात शाह यांनी मोदी सरकारची प्रशंसा केली. 

'यूपीए'च्या काळात भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येऊनही कॉंग्रेसचे वर्तन "चोर तो चोर, वरून शिरजोर' असे असल्याचा टोला शाहनी लगावला. केवळ वीस कोळसा खाणींच्या लिलावातून खजिन्यात दोन लाख कोटींची पडलेली भर आणि स्पेक्‍ट्रम लिलावातून मिळालेली रक्कम पाहता या गैरव्यवहाराबाबत कॉंग्रेसने आता उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. 

काळ्या पैशावरूनही शहा यांनी कॉंग्रेसवर प्रहार केले. काळा पैसाधारकांची नावे उघड करण्यासाठी ज्यांचा आग्रह आहे, ते खरे काळ्या पैशाचे वकील आहेत. नावे जाहीर झाल्यास आंतरराष्ट्रीय करारानुसार इतरांची नावे मिळणार नाहीत. अशी मागणी करणाऱ्यांचा खरा हेतू काळा पैसा बाळगणाऱ्यांना वाचविण्याचा आहे. यासंदर्भात सरकारने आणलेला कायदा लागू झाल्यास नवा पैसाही देशाबाहेर जाणार नाही, असा दावा शाह यांनी केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.