10
10
मॅगीवरुन वादळ उठल्याने केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या ग्राहकांची फसवणूक झालेल्या प्रकरणांमध्ये दोषींना जन्मठेपेची शिक्षा करण्याची तरतूद असणारा एक नवीन कायदा करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, असे केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.
अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता झालीये. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल रात्री उशिरा USA फ्रीडम अॅक्टवर सही केली. यामुळे 9/11च्या हल्ल्यानंतर अस्तित्वात आलेल्या वादग्रस्त देखरेख कायद्याचा परिणाम संपलाय.
अयोध्येत राम मंदिर बांधण्याची गरज आहे. अन्यथा लोकांचा विस्फोट होईल. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याकडे कोणतेही सरकार दुर्लक्ष करु शकत नाही, असे विधान भाजपचे उत्तर प्रदेशचे नेतृत्व करणारे राज्यसभेतील खासदार विनय कटीयार यांनी केले.
तेलंगणा या राज्याची निर्मिती होऊन आज १ वर्षं झालं. यानिमित्त आठवड्याभराच्या जल्लोषाची सुरूवात हैदराबादमध्ये झाली.
मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी अमिनेता अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांच्या विरोधात बिहारमधील मुजफ्फरपुर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मॅगीचे निर्माते नेस्ले यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झालाय.
बीएसएनएल ही सरकारी दूरसंचार कंपनी १५ जूनपासून नवी रोमिंग योजना लागू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांची रोमिंगमधून सुटका होऊन मोफत कॉल्स करता येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
माजी खेळाडू रवी शास्त्री यांची बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय बांगर बॅटिंग कोच आणि बी. अरुण हे बॉलिंग कोच असणार आहेत.
आसाम मंडळाच्या १० वी (HSLC))परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आज सकाळी १० वाजता निकाल घोषित करण्यात केला. दहावीची परीक्षा १९ फेब्रुवारी २०१५ सुरु झाली ती १२ मार्चपर्यंत सुरु होती. या परीक्षेसाठी ४ लाख विद्यार्थी बसले होते.
मॅगी बनविणाऱ्या नेस्ले कंपनी आता अन्न आणि औषध प्रशासनाने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसीमुळे अडचणीत आली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची घौडदौड जोरात आहे. भारताने चीनला मागे टाकत ही घौडदौड सुरुच ठेवली असून विकासदर ७.५ टक्क्यांवर पोहोचलाय.