स्विस बँकेनं जाहीर केली दोन भारतीयांची नावं

स्वित्झर्लंडनं स्विस बँकेत खातं असणाऱ्या विदेशी नागरिकांची नावं जाहीर केले आहेत. त्यात दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडनं त्याच खातेदारांची नावं जाहीर केलं ज्यांच्याविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये चौकशी सुरू आहे. स्वित्झर्लंडनं आपल्या सरकारी राजपत्रामध्ये या खातेदारांची नावं सार्वजनिक केली आहे.

PTI | Updated: May 26, 2015, 08:48 AM IST
स्विस बँकेनं जाहीर केली दोन भारतीयांची नावं  title=

बर्न: स्वित्झर्लंडनं स्विस बँकेत खातं असणाऱ्या विदेशी नागरिकांची नावं जाहीर केले आहेत. त्यात दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडनं त्याच खातेदारांची नावं जाहीर केलं ज्यांच्याविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये चौकशी सुरू आहे. स्वित्झर्लंडनं आपल्या सरकारी राजपत्रामध्ये या खातेदारांची नावं सार्वजनिक केली आहे.

नावं जाहीर करतांना स्विस फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशन (एफटीए)नं त्या दोन्ही भारतीयांना सांगितलं की, जर त्यांना वाटत असेल त्यांच्याविषयीची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना देवू नये तर त्यांनी ३० दिवसांच्या आत फेडरल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्टात अपील करावं. 

स्विस बँकेत खातं असणाऱ्या त्या दोन महिलांची नावं स्नेहलता साहनी आणि संगीता साहनी आहे. त्यांच्या जन्मतारखेशिवाय इतर माहिती अद्याप मिळाली नाहीय. बँकेच्या यादीमध्ये अमेरिकन आणि इस्राइलमधली खातेदारांचाही समावेश असल्याचंही सांगण्यात येत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.