10
10
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बोगस कायदा पदवी प्रमाणपत्र प्रकरणी जिंतेद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे.
नेस्लेच्या मॅगीमध्ये हानीकारक पदार्थ अतिप्रमाणात आढळल्यानंतर आता ‘ग्लुकॉन डी’ या प्रसिद्ध एनर्जी ड्रिंकच्या पॅकेटमध्ये अळ्या सापडल्यानं खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंद शहर जिल्ह्यात ‘ग्लुकॉन डी’च्या पावडरमध्ये अळ्या सापडल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे ढाक्क्यात जोरदार स्वागत करण्यात आले. विमानतळावर पंतप्रधान शेख हसिना यांनी मोदी यांचे स्वागत केले. या दौऱ्यात अनेक करार होण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे.
जम्मूमध्ये शिख समुदायानं बंदची हाक दिली. काल पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एक युवक ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. याच्याविरोधात हा बंद होता.
दोन मिनिटांत बनणारी मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेण्यात येणार आहे. मॅगीबाबत देशभर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नेस्ले कंपनीनं हा निर्णय घेतलाय.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी रंगत आतापासून आलेय. राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. ही निवडणूक आम्ही सर्व एकत्र लढविणार आहोत, असे जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
मणिपूरमधल्या चंडेल जिल्ह्यामध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात १० जवान शहीद झालेत. या हल्यामध्ये ८ ते १० जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, जखमी जवानांना नागालँडमध्ये हवाईमार्गे उपाचारांसाठी हलवण्यात आले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आंबा आणि लिचीच्या १०० झाडांच्या सुरक्षेची काळजी लागलीये. त्यासाठी त्यांनी तब्बल २४ पोलीस तैनात केलेत. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांना आंबे आणि लिची खायला मिळू नये, म्हणून या झाडांची सुरक्षा वाढवल्याचा आरोप मांझी यांनी केलाय.
जागतिक योगदिनानिमित्त राजधानीतील राजपथ येथे आयोजित कार्यक्रमासाठी मोदी सरकारने कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केले आहे. २१ जून रोजी योगदिन होत आहे.