मोदींचे भाषण आणि घोषणा वास्तवापासून खूप दूर : राज बब्बर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मोठी स्वप्न दाखवून सत्तेत आलेत. मात्र, त्यांनी दाखविलेली स्वप्ने ही दिवास्वप्न आहेत. कारण प्रत्यक्षात वास्तवापासून ती दूर आहेत, असे मत काँग्रेस नेते राज बब्बर यांनी व्यक्त केले.

PTI | Updated: May 26, 2015, 04:39 PM IST
मोदींचे भाषण आणि घोषणा वास्तवापासून खूप दूर : राज बब्बर title=

रांची  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मोठी स्वप्न दाखवून सत्तेत आलेत. मात्र, त्यांनी दाखविलेली स्वप्ने ही दिवास्वप्न आहेत. कारण प्रत्यक्षात वास्तवापासून ती दूर आहेत, असे मत काँग्रेस नेते राज बब्बर यांनी व्यक्त केले.

मोदी यांनी लोकांना अनेक स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली. आता एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती दिवास्वप्न असल्याचे दिसत आहे. आर्थिकविकासासाठी आणि उद्योगपतींना ब्लूप्रिंट दाखविली गेली. मात्र, एक वर्षात ती सामान्य गोष्ठ राहिली. मोदी सरकारने केवळ घोषणाच केल्यात. देशात घोषणा करणारे सरकार नको. असे सरकार पाहिजे, जे जमिनीवर राहून काम करणारे असावे. त्यामुळे प्रगती होते असे बब्बर म्हणालेत.

मोदींनी जास्त परदेश दौऱ्यावर भर दिलाय. त्यांनी परदेशात जाऊन फोटो काढण्यावर भर दिला आणि त्याचेच गुणगाण गात आहेत. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे अश्रू फुसण्याऐवजी परदेश दौऱ्यावर भर दिला. आपला काम लविण्यासाठी मागच्या सरकारवर ते सातत्याने आरोप करत आहेत. मोदीनी काळा पैसा भारतात आणलेला नाही, असे बब्बर म्हणालेत.

काळा पैसा भारतात आणल्यावर १५ लाख रुपये खात्यात जमा केले जातील, असे सांगितले. त्यामुळे जनधन योजनेच्या माध्यमातून लोकांनी खाते काढलीत. अजूनही कोणतेही धन जमा केलेले नाही, अशी टीका बब्बर यांनी केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.