जागतिक कीर्तीचे गणिततज्ज्ञ जॉन नॅश दाम्पत्याचं कार अपघातात निधन

नोबेल पुरस्कारविजेते अमेरिकेतील प्रसिद्ध गणितज्ज्ञ जॉन नॅश यांचं निधन झालंय. शनिवारी न्यू जर्सीत एका अपघातात नॅश यांचा दुर्दैवी अंत झालाय.या अपघातात नॅश यांच्या ८२ वर्षीय पत्नी एलिशिया यांचाही करुण अंत झालाय. 

PTI | Updated: May 25, 2015, 11:41 AM IST
जागतिक कीर्तीचे गणिततज्ज्ञ जॉन नॅश दाम्पत्याचं कार अपघातात निधन title=

नवी दिल्ली: नोबेल पुरस्कारविजेते अमेरिकेतील प्रसिद्ध गणितज्ज्ञ जॉन नॅश यांचं निधन झालंय. शनिवारी न्यू जर्सीत एका अपघातात नॅश यांचा दुर्दैवी अंत झालाय.या अपघातात नॅश यांच्या ८२ वर्षीय पत्नी एलिशिया यांचाही करुण अंत झालाय. 

स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडलाय. कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय. 

या अपघातात अन्य एक प्रवासी जखमी झालाय. या महिन्याच्या सुरुवातीलाच नॅश यांना मानाचा नोबेल पुरस्कारसुद्धा जाहीर झाला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.