जेव्हा ३९ हजार फूट उंचावर असलेल्या विमानाच्या इंजिनातील गेली वीज...

सिंगापूर एअरलाइन्स (एसआयए)मध्ये बसून शांघायला जाणाऱ्या प्रवाशांचा जीव काठावर आला जेव्हा खराब वातावरणामुळे विमानाच्या इंजिनामधील वीज अचानक गेली. विमानातून १९४ प्रवासी प्रवास करत होते. 

PTI | Updated: May 27, 2015, 02:43 PM IST
जेव्हा ३९ हजार फूट उंचावर असलेल्या विमानाच्या इंजिनातील गेली वीज... title=

सिंगापूर: सिंगापूर एअरलाइन्स (एसआयए)मध्ये बसून शांघायला जाणाऱ्या प्रवाशांचा जीव काठावर आला जेव्हा खराब वातावरणामुळे विमानाच्या इंजिनामधील वीज अचानक गेली. विमानातून १९४ प्रवासी प्रवास करत होते. 

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार एअरबस ए३३०-३०० एसक्यू ८३६ फ्लाइटनं शनिवारी चांगी विमानतळावरून उड्डाण केलं. मात्र जवळपास साडेतीन तासांनंतर ३९ हजार फूट उंचावर विमान असतांना ही घटना घडली. इंजिनातील वीज अचानक गेली. 

विमान कंपनीच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'दोन्ही इंजिनची वीज काही काळासाठी गेली आणि पायलट्सना इंजिन सामान्यपद्धतीनं सुरू ठेवण्यासाठी इतर उपाय करावे लागले.'  त्यांनी सांगितलं की, विमानात १८२ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. विमान स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजून ५६ मिनिटांनी सुरक्षितपणे शांघायला पोहोचलं. 

शांघायला पोहोचल्यानंतर इंजिनाचा तपास करण्यात आला. मात्र त्यात कोणतीही गडबड दिसली नाही. एसआयए घटनेचा तपास करत आहे. इंजिन निर्माता रोल्स रॉयल आणि एअरबसची चौकशी सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.