नवी दिल्ली : आता बातमी तुमच्या कामाची. आगामी काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
आगामी काळात इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. कारण इंधनसज्ज अमेरिकेतील तेल किंमती बॅरलमागे ४० डॉलरवर आल्यात. अमेरिकेतल्या वाढत्या तेल उत्पादनामुळे ही घसरण झालीय.
तेल किंमतीच्या घसरणीचा हा सलग आठवा आठवडा आहे. २९ वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरण सातत्य नोंदवलं गेलंय. तेल किंमतीतील घसरणीचे धक्के जागतिक भांडवली बाजारालाही बसले असून तेल प्रकल्पांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळं आगामी काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.