नवी दिल्ली : बँक कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या, चौथ्या शनिवारी सुटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातील सर्वच बँक कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून ही सुटी लागू होणार आहे.
महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी देण्याच्या निर्णयावर केंद्रीय अर्थमंत्रालयाने अधिसूचना काढून गुरुवारी शिक्कामोर्तब केले.
सरकार, भारतीय बँक महासंघ आणि बँकांच्या कर्मचारी संघटना यांच्यात २५ मे रोजी एक त्रिपक्षीय करार झाला होता. या करारानुसार हा निर्णय घेण्यात आला, असे बँक कर्मचाऱ्यांचे नेते आणि 'एआयबीईए'चे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी सांगितले.
या करारावर ११ खासगी आणि सात विदेशी बँकांनीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.