आंबेडकर यांचे लंडनमधील घर महाराष्ट्राच्या हातचे जाणार?

लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान महाराष्ट्राच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. लंडनमधील जागेचा व्यवहार हा लालफितीत अडकलाय.

PTI | Updated: Aug 22, 2015, 11:23 AM IST
आंबेडकर यांचे लंडनमधील घर महाराष्ट्राच्या हातचे जाणार? title=

लंडन : लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान महाराष्ट्राच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. लंडनमधील जागेचा व्यवहार हा लालफितीत अडकलाय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये वास्तव्य केले होते. ते वास्तव्य केलेले घर घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने पुढाकार घेतला. त्याबाबत घोषणा करण्यात आली. घर घेण्यासाठी हालचाल सुरु झाली. जागा खरेदीची प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने ८ महिने उशीर केला आहे. त्यामुळे संतापलेल्या वास्तूच्या मालकाने सोमवारपर्यंत व्यवहार पूर्ण केला नाही तर भारताला ही वास्तू दिली जाणार नाही, अशी धमकी दिलेय.  

नक्की काय घडलंय?
- जागेचा व्यवहार हा लालफितीच्या कारभारात अडकला.  
- आठ महिन्यांपासून ही प्रक्रिया चालू आहे.
- केंद्र, राज्य सरकारनं लक्ष घालूनही प्रक्रिया अर्धवटच राहिली
- ही जागा डग्लस स्माइली यांची आहे, त्यांनी उशीर धमकी देलेय.
- व्यवहार पूर्ण करण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत दिलेय
- लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील  सचिव एम. पी. सिंह यांनी सामाजिक न्याय खात्याचे प्रधान सचिव उज्ज्वल उके यांना पाठविला ई मेल.

का वाद चिघळला...?
- वास्तूमालकांना ही जागा ३१ कोटी रुपयामध्ये विकायची आहे
- भारत सरकारच्या मूल्यांकन करणाऱ्या समितीने वास्तूची किंमत २९ कोटी ९५ लाख रुपये दिली आहे.
- वास्तू मालकाला एक कोटी पाच लाख रुपयांचा तोटा होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.