नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर उद्या आणि परवा होणारी चर्चा रद्द करण्याचे संकेत भारतानं दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर हुर्रियत नेता शब्बीर शाह यांना दिल्ली विमानतळावर नजरकैदेत ठेवण्यात आलंय.
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांना भेटण्यासाठी शाह श्रीनगरहून दिल्लीत दाखल झाले होते.. मात्र विमानतळावरच त्यांना अटक करण्यात आलीय.. भारताला विश्वासात न घेताच पाकिस्ताननं काश्मीरमधील फुटीरतावादी हुर्रियतच्या नेत्यांना एनएसए बैठकीचं निमंत्रण दिलंय. मात्र पाकिस्तानची ही मागणी धुडकावत भारतानं यावर तीव्र नापसंती व्यक्त केलीय.
मात्र पाकिस्ताननं आपला आडमुठेपणा कायम ठेवला होता. त्यामुळं अखेर ही चर्चा रद्द करण्याचा निर्णय भारतानं घेतला. पाकिस्तान चर्चेबाबत गंभीर नसल्याचा आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलाय. दुसरीकडे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.