नवी दिल्ली: वन रँक, वन पेन्शन योजनेसाठी माजी स्वातंत्र्य सैनिक आक्रमक झालेत. जंतरमंतर स्वातंत्र्य सैनिकांचं आंदोलन सुरु असून या आंदोलनाचा 70 वा दिवस आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या या आंदोलनाला केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांच्या लेकीचाही पाठिंबा मिळालाय.
व्ही. के. सिंग यांची कन्या मृणालिनी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. मीसुद्धा एक माजी स्वातंत्र्य सैनिकाची कन्या आहे त्यामुळं ही योजना लवकरात लवकर लागू व्हावी अशी मागणी त्यांनी केलीय.
आपले वडील मोदी सरकारमध्ये विदेश राज्यमंत्री आहेत, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तुम्ही त्यांची परवानगी घेतली का, या प्रश्नावर मृणालिनीनं सांगितलं, 'मी त्यांच्याकडे परवानगी मागितली नाही आणि मला त्याची गरज वाटत नाही. मी हिस्सारहून सरळ इथं आली कारण मला हे माझं कर्तव्य वाटतं. काही वर्षांनंतर मी पण एका माजी सैन्याची पत्नी होईल.'
त्या पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माझा संपूर्ण विश्वास आहे. त्यांनी 'वन रँक, वन पेन्शन'चं वचन दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.