काबूल : अफगाणिस्तानमधील हेरात इथं झालेल्या गॅस टर्मिनलच्या स्फोटात 10 मुलांचा आणि एका प्रौढ व्यक्तिचा मृत्यू झालाय. तर 18 नागरिक जखमी झाले आहेत. लढाईमध्ये बेपत्ता झालेल्या नागरिकांसाठी कॅम्प असलेल्या जागेजवळ हा स्फोट झाला असून हा अपघात आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दुसऱ्या महायुद्धातील विमान सापडलं
पोलंडमध्ये दुस-या महायुद्धाच्यावेळेचं एक विमान सापडलं आहे. हे विमान सोव्हियत संघ दरम्यान बनवलं गेलेलं प्रोपेलर वाला इल्यूशिय-2 आहे. एका ओढ्यामध्ये हे विमान सापडलं असून दुस-या महायुद्धात सोव्हियत संघानं जर्मनीवर केलेल्या हल्ल्यांमध्ये या विमानाच अनेकदा वापर केला होता.
गॅस पाईपलाईन फुटली
उझबेकिस्तानची राजधानी असलेल्या ताश्कंतमध्ये गॅस पाईपलाईन फुटल्यानं मोठा धमाका झालाय. या धमाक्यामुळे ताश्कंत मोठ्याप्रमाणात हादरलं आहे. दरम्यान या धमाक्यात कोणीही जखमी झालेलं नाही. या धमाक्यामुळे जवळपास 30हजार नागरिकांना कित्येक दिवस गॅस पुरवठा होणार नाही.
रशिया-चीन नौदलाचा संयुक्त अभ्यास
रशिया आणि चीनची नौदल जपानच्या समुद्रामध्ये संयुक्तरित्या लढाईचा अभ्यास करत आहेत. जॉईंट सी-2015 नावानं या संयुक्त अभ्यासामध्ये एँटी-सबमरिन आणि एअर डिफेन्स ड्रिल केलं जात आहे. या ड्रिलमध्ये चीनची अनेक युद्धसामुग्री आणि विमानं सामिल आहेत. तर रशियाची 16 युद्धासामुग्री आणि दोन पानबुड्यांचा समावेश आहे.
साडेतीन बिलियन डॉलर गमावले
शेअर मार्केट गडगडल्यानं चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तिनं एकाच दिवसात साडेतीन बिलियन डॉलर गमावले आहेत. वँग जियालिन असं त्यांचं नाव असून ते जो डालियन वांडचे संस्थापक आहेत. त्यांनी आपली संपत्तीच्या दहा टक्के भाग शेअर मार्केट घसरल्यामुळे गमावला आहे.
अमेरिकेची मोस्ट वॉन्टेट लिस्ट
अमेरिकेने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर सक्रिय असलेल्या हक्कानी नेटवर्कचा नवा प्रमुख अब्दुल अजीज हक्कानीला आपल्या मोस्ट वॉन्टेट लिस्टमध्ये सामिल केलय. हक्कानी नेटवर्क अफगाणिस्तानमध्ये अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामिलं आहे.
मुलीचा आत्मघाती बॉम्बस्फोट
नायजेरियामध्ये एका मुलीनं आत्मघाती बॉम्बस्फोट केला. या हल्ल्यामध्ये पाचजणांचा मृत्यू झाला असून तीसजण जखमी झाले आहेत. दमातुरु इथं झालेल्या या आत्मघाती हल्ल्यामागे बोको हरम संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्मघाती हल्ला केलेल्या मुलीचं वय 14 वर्षांचं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.