नवी दिल्ली : महिला कर्मचाऱ्यांना 8 महिने बाळंतपणाची रजा द्यायला हवी अशी मागणी, केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केली आहे.
बाळंतपणाच्या कायद्यातल्या कलम 196 अंतर्गत सध्या पगारी तीन महिन्याची रजा देण्यात येते. आठ महिन्याची पगारी रजा दिल्यास महिलांना आपल्या नवजात बालकांचं व्यवस्थित पालनपोषण करण्यासाठी अधिक वेळ मिळेल, असा मनेका गांधींचा युक्तीवाद आहे.
कामगार मंत्रालायनं बाळंतपणाची रजा तीन वरून सहा महिन्यावर नेण्याची तयारी आधीच सुरू केलीय. त्यात महिला आणि बालविकास मंत्र्यांनी आणखी दोन महिने वाढवून मागितले आहेत. त्यात बाळाच्या जन्माआधी एक महिना आणि जन्मानंतर सात महिने रजा मिळावी, असा मनेका गांधींचा प्रस्ताव आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.