न्यूयॉर्क : भारतात प्रशासकीय सुधारणांना आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे सांगत तुम्ही गुंतवणूक करा. त्यासाठी अत्यंत सुलभ आणि सुटसुटीत मंजुरीची प्रक्रिया असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना आश्वासन दिले.
‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आणि अध्यक्षांची नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. त्यावेळी हे आश्वासन दिले. मोदींनी ‘मेक इन इंडिया’च्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे.
फॉर्च्युन मासिकाने या भेटीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला अमेरिकेतील महत्त्वाच्या कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
भारतात प्रशासकीय सुधारणांना आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे मोदी यांनी सर्व सीईओंना सांगितले.
गेल्या वर्षभरात सरकारने कोणकोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतले याचे सादरीकरणही या बैठकीवेळी मोदींनी केले. अनेक सीईओ या सादरीकरणाने प्रभावित झाले. सर्व सीईओंनी मोदींसोबत रात्रीचे भोजन घेतले.
या कार्यक्रमाला एकूण ४७ महत्त्वाच्या कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. त्यामध्ये पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रा नुयी, डाऊ केमिकल्सचे अध्यक्ष अॅंड्र्यू लिव्हेरिस, लॉकहिड मार्टिनचे अध्यक्ष आणि सीईओ मार्लिन हेवसन, फोर्डचे अध्यक्ष मार्क फिल्ड इत्यादींचा समावेश होता.
My interaction with Fortune 500 CEOs was on investment opportunities in India & why they must come & @makeinindia! pic.twitter.com/XVK18jbjuC
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.