न्यूयॉर्क : विकास हवा असेल तर जगातील गरीबी संपवली पाहिजे. तसेच विश्वसनियता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात बदल करणे गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी यूएनमध्ये भाषण करताना हे मत व्यक्त केले.
मोदींनी यावेळी विकासावर भर दिला. आजची आव्हाने आणि समस्या यांचा विचार करुन काळाशी सुसंगत असा विकास साधायला हवा. विकासासाठी जगभरातली गरीबी नष्ट करणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणालेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात शेफ विकास खन्ना यांना स्वाक्षरी करून तिरंगा भेट दिल्याबद्दल नवा वाद निर्माण झाला आहे. या कृतीबद्दल तीव्र टीका सुरू झाल्यानंतर हा तिरंगा परत घेण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.