मुंबई : परदेशातील मंदी आणि ग्राहकांची मागणी कमी असल्याने देशाच्या राजधानी सराफा बाजारात सोने दर सलग तिसऱ्या दिवशी घसरलेला पाहायला मिळाला. सोने दरात २३५ रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोने प्रति तोळा २६,५७५ रुपये दर होता.
औद्योगिक क्षेत्रातील घटती मागणी आणि नाणे निर्मात्यांची कमी मागणी यामुळे सोने बाजारात उठाव नसल्याने सोने दरात घसरण झाली. तसेच चांदीचाही उठाव न झाल्याने चांदीचा किलोचा भाव खाली आला. ३५,००० रुपयांच्या खाली चांदीचा दर होता. ९०० रुपयांची भावात घट होऊन चांदी ३४,७०० रुपये प्रति किलो दर होता.
बाजार सूत्रांच्या माहितीनुसार अमेरिकन फेडरल रिर्झव्ह बॅंकेने व्याज दरात वाढ करण्याची शक्यता लक्षात घेऊन सोन्याची मागणीत घट झाली. जागतिक पातळीवर सोने ०.६ टक्क्यांनी घसरले. १,१२५.७२ डॉलर प्रति औंस सोने होते. तर चांदी ०.५ टक्क्यांनी घसरुन १४.५२ डॉलर प्रति औंसवर गेला.
दरम्यान, हिंदू धर्मात 'श्राद्ध'च्या काळात खरेदी करण्यात येत नाही. त्यामुळे विक्रेत्यांकडून सोन्याचा उठाव झालेला नाही. त्यामुळे सोन्याचा दरात घसरण पाहायला मिळत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.