निवृत्तीबाबत वृत्ताचा इन्कार, देशात परतल्यानंतर बोलेन : वीरेंद्र सेहवाग

टीम इंडियाचा आघाडीचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिल्याचे वृत्त प्रसिद्ध होतात सेहवागने याचा इन्कार केला. मला जे काही बोलायचे आहे ती मी भारतात परतल्यानंतरच बोलेन, असे त्याने म्हटलेय.

PTI | Updated: Oct 20, 2015, 10:04 AM IST
निवृत्तीबाबत वृत्ताचा इन्कार, देशात परतल्यानंतर बोलेन : वीरेंद्र सेहवाग title=

दुबई : टीम इंडियाचा आघाडीचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिल्याचे वृत्त प्रसिद्ध होतात सेहवागने याचा इन्कार केला. मला जे काही बोलायचे आहे ती मी भारतात परतल्यानंतरच बोलेन, असे त्याने म्हटलेय.

अधिक वाचा : वीरेंद्र सेहवागचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत

वीरेंद्र सेहवागनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असल्याची बातमी दुबईमधून आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्ममध्ये आता सेहवाग खेळतांना दिसणार नाही, असे वृत्त होते. मात्र, आपण निवृत्तीबाबत काहीही बोललो नाही. मला जर बोलायचे असेल तर मी देशात बोलेन, असे सांगून वीरेंद्र सेहवागने निवृत्तीचे संकेत धुडकावून लावलेत.

सेहवागने कसोटी खेळण्याची इच्छा बीसीसीआयकडे व्यक्त केली होती. मात्र, बीसीसीआयने यास नकार दिला. कालच कसोटी टीमची घोषणा करण्यात आली. सेहवागला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांने निवृत्ती केल्याचे बोलले जात होते. मात्र, आपण निवृत्तीबाबत बोललो नाही, असे सेहवागने म्हटलेय.

२०१६ केवळ निवृत्त क्रिकेटपटूंसाठी असलेल्या 'मास्टर्स चॅम्पियन्स लीग २०२०' मध्ये खेळण्याची तयारीही दर्शविली आहे. दुबईत असलेल्या सेहवागने निवृत्तीसंदर्भातील औपचारिक घोषणा भारतात परतल्यानंतर करण्यात येईल, असे स्पष्ट केले. 

माजी क्रिकेटपटूंसाठी असलेल्या या २०२० लीग स्पर्धेच्या उद्‌घाटनासाठी सेहवाग हा दुबई येथे उपस्थित होता. सेहवागबरोबरच ब्रायन लारा, ग्रॅमी स्मिथ आणि अझर मेहमूद हे खेळाडूदेखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. यावेळी निवृत्तीसंदर्भातील प्रश्‍न विचारला असता निवृत्तीची घोषणा भारतामध्ये परतल्यानंतर करेन, असे सेहवाग याने स्पष्ट केले. 

ही स्पर्धा पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात खेळविली जाणार आहे. यामुळे सध्या हरियाणा संघातर्फे खेळत असलेला सेहवाग आता रणजी स्पर्धा संपवून या स्पर्धेमध्ये सहभागी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.