मुंबई : क्रिकेट खेळात कोणीही राजकारण आणू नये, अस सल्ला देण्यात येतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडात दिसून येत आहे. पाकिस्तानमधून वाढत्या भारतविरोधी कारवाया याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे पाकिस्तान कलाकार, खेळाडू यांना विरोध शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने कॉमेंट्रीला नकार दिलाय.
वसिम अक्रम, शोएब अख्तर यांनी मुंबईतील वन-डे सामन्यात कॉमेंट्री करण्यास नकार दिलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांच्याविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल बीसीसीआय कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
२५ ऑक्टोबर रोजी मुंबईत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान शेवटचा एकदिवसीय सामना पार पडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी वसिम अक्रम आणि शोएब अख्तर पाकिस्तानला परत जाणार आहेत.
दरम्यान शिवसेनेच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी पंच अलीम दार भारत- दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडलेत. त्यांनाही मुंबईतील सामन्यात अंपायरिंग करू न देण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. अलीम दार हे चेन्नई आणि मुंबईतील सामन्यात अंपायरींग करणार होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.