नवी दिल्ली : उबेर टॅक्सी बलात्कारप्रकरणातील आरोपी चालक शिवकुमार यादव याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्याला २३ ऑक्टोबरला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
पाच डिसेंबर २०१४ रोजी टॅक्सीमध्ये एका महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयात आज झालेल्या सुनावणी झाली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी उबेर टॅक्सी चालक शिवकुमार यादव याला दोषी ठरवले आहे.
दरम्यान, पीडित तरुणी कामावरून घरी परतत असताना टॅक्सीमध्ये बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी उबेर टॅक्सी चालक शिवकुमार यादव याला सात डिसेंबर २०१४ रोजी मथुरा येथून अटक करण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.