नवी दिल्ली : केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोगाची गूड न्यूज दिली असताना आता काम चुकारपणा करणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट केलेय. याबाबतची शिफारस या आयोगात करण्यात आलेय.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढ सुचवणारा सातव्या वेतन आयोगाचा अहवाल सादर झालाय. गेल्याच आठवडय़ात केंद्र सरकारकडे हा अहवाल सादर केला. कर्मचाऱ्यांना साडेतेवीस टक्के घसघशीत वेतनवाढ आयोगाने सुचवली आहे.
कामात टाळाटाळ करण्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वृत्तीला आळा घालण्यासाठी आयोगाने वार्षिक वेतनवाढ न देण्याची शिफारसही अहवालात केली आहे. सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित वेतन (पीआरपी) देण्याची शिफारस आहे.
कर्मचाऱ्यांनी काम करुन चालणार नाही तर त्यांना चांगला शेराही मिळणे आवश्यक आहे. त्यावरच त्यांच्या कामाचे मूल्यमापण होणार आहे. ‘चांगला’, ‘अधिक चांगला’ असा शेरा कर्मचाऱ्यांना कामकाजाबाबत मिळणे आवश्यक असल्याचे या आयोगात नमूद करण्यात आले आहे.
कामगिरीचे निकष पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ दिली जाऊ नये. त्यामुळे कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखून ठेवण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.