आप आमदार अखिलेश त्रिपाठी यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक

 आम आदमी पार्टीचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याने आपला राजकीय हादरा बसलाय.

PTI | Updated: Nov 26, 2015, 06:36 PM IST
आप आमदार अखिलेश त्रिपाठी यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक title=

नवी दिल्ली :  आम आदमी पार्टीचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याने आपला राजकीय हादरा बसलाय. अटक करण्यात आलेले हे पाचवे आमदार आहेत.

२०१३मध्ये अशांतता निर्माण केल्याप्रकरणी अखिलेश यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक केलेले आपचे पाचवे आमदार आहेत. अखिलेश त्रिपाठी दिल्लीच्या मॉडेल टाऊनचे आमदार आहेत.

याआधी आपचे सोमनाथ भारती, जितेंद्र तोमर, मनोज कुमार आणि कमांडो सुरेंद्र सिंग यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.