आशियाई परिषदेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट

मलेशिया आणि आणि सिंगापूर दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मलेशियाची राजधानी क्वालालंम्पूरमध्ये दाखल झालेत. या ठिकाणी होणा-या आशियाई परिषदेवरही दहशतवादाचे सावट आहे. महिला आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता आहे.

PTI | Updated: Nov 21, 2015, 11:55 AM IST
आशियाई परिषदेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट title=

क्वालालंम्पूर : मलेशिया आणि आणि सिंगापूर दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मलेशियाची राजधानी क्वालालंम्पूरमध्ये दाखल झालेत. या ठिकाणी होणा-या आशियाई परिषदेवरही दहशतवादाचे सावट आहे. महिला आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता आहे.

क्वालालंम्पूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इसिसच्या १० महिलांचं पथक आत्मघाती हल्ल्यासाठी मलेशियामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. परिषदेदरम्यान आत्मघाती स्फोट करण्याच्या उद्देशाने या महिला मलेशियात आल्याची माहिती पुढे येत आहे. 

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिषदेच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुमारे ४५०० पोलीस  कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.