सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा, संविधान आदर्शांवर घाला

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. देशातील अहिष्णूतेवर त्यांनी भाष्य केले. संविधानात ज्या आदर्शांनी आम्हाला प्रेरित केले. त्याच आदर्शांवर घाला घालण्याचे काम करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

PTI | Updated: Nov 26, 2015, 05:00 PM IST
सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा, संविधान आदर्शांवर घाला title=

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. देशातील अहिष्णूतेवर त्यांनी भाष्य केले. संविधानात ज्या आदर्शांनी आम्हाला प्रेरित केले. त्याच आदर्शांवर घाला घालण्याचे काम करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

सोनिया गांधी यांनी नाव न घेता मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. काही महिन्यांपासून देशात जी स्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून स्पष्ट दिसत आहे. ज्या संविधानने आम्हाला प्रेरित केले आहे. त्याच्यावरच घाला घालण्याचे काम होत आहे. हा मोठा धोका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर यांच्या १२५ व्या जन्मशताब्दी वर्ष पूर्तीवर लोकसभेत 'भारतच्या संविधान प्रति वचनबद्धता' या विषयावर चर्चा करताना त्या म्हणाल्यात. यावेळी सोनिया गांधी यांनी केंद्रातील भाजपवर जोरदार प्रहार केला.

आंबेडकरांनी सांगितले होते, संविधान कितीही चांगले असले तरी मात्र, ते लागू करणारे चांगले नसले तर त्याचा वाईट परिणाम होतो. संविधानचा आत्मा हा भावनेशी निगडीत आहे. आजचा दिवस सुखाचा आहे तसा दुखा:चाही आहे. संविधानातील आदर्शांवर आज जाणुनबुजून हल्ला केला जात आहे. तसेच संविधानातील गोष्टींची अंमलबजावणी नसल्याचा आरोप यावेळी सोनिया गांधींनी केला. 

संविधानाच्या निर्मितीत ज्या लोकांचा कोणताही सहभाग नव्हता तेच लोक आज संविधानाची भाषा करत असल्याचे सांगत यावेळी सोनियांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला हाणला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.