मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सचिवालय कार्यालयावर आज सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यांचे कार्यालय सील केलेय.

PTI | Updated: Dec 15, 2015, 10:44 AM IST
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सचिवालय कार्यालयावर आज सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यांचे कार्यालय सील केलेय.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी हा छापा कोणत्या कारणास्तव टाकला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. केजरीवाल यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीयदृष्ट्या मला हाताळण्यात असमर्थ ठरत असल्याने, ते अशी भ्याड कृत्ये करत असल्याचा, आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

देशात मुख्यमंत्री कार्यालयावर सीबीआयकडून छापा टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्र्यांचे तिसऱ्या मजल्यावर सचिवालय कार्यालय आहे. या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकलाय. हा राजकीय गेम असल्याची चर्चा सध्या सुरु झालेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.