न्यूयॉर्क : ISIS (इसिस) या दहशतवादी संघटनेचा आर्थिक डोळारा सांभाळणारा प्रमुख अबू सालेह हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने या वृत्तास दुजोरा दिला आहे.
नोव्हेंबरच्या अखेरीस करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात ISIS चा सालेह ठार झाला, असे अमेरिकी लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितलेय. गेल्या महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने इराकमधील कारवाई तीव्र केलेय.
अबू सालेहचे (४२) मूळ नाव मुअफ्फक मुस्तफा मुहम्मदअल-कर्मुश असून, तो मूळचा इराकचा होता. हवाई हल्ल्यामध्ये त्याच्यासह दोन साथीदारही ठार झालेत. हे दोघेही ISISच्या आर्थिक विभागाचेच काम पाहत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.