नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीत पुन्हा निभर्याची पुनरावृत्ती घडलेय. एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन सहा नराधमांनी धावत्या गाडीत सामूहिक बलात्कार केला. ही घटना रानहोलामध्ये घडलेय.
अधिक वाचा : 'त्या' अल्पवयीन दोषीचा चेहरा दाखवा, निर्भयाच्या आईची मागणी
पीडित अल्पवयीन मुलगी सातव्या इयत्तेत शिकत आहे. पीडित मुलीने ६ पैकी दोघाना ओळखत होती. गुरुवारी ती त्यांच्यासोबत शाळेतून बाहेर पडली. त्यानंतर चार जण दाखल झाले. या सहा जणांनी तिचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अधिक वाचा : निर्भया हत्याकांड : स्वामींच्या याचिकेवर कोर्टाची केंद्राला नोटीस
ज्या गाडीमध्ये बलात्कार झाला ती गाडी कॉलसेंटरची होती. आरोपींपैकी एक जण कॉलसेंटरमध्ये नोकरी करतो. दिल्लीच्या रस्त्यावरुन ही गाडी पळवत असताना, पोलिस नियंत्रण कक्षाच्या व्हॅनने या गाडीचा पाठलाग करुन मुलीची सुटका केली. पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलेय.
रमेश, नरेंद्र, राहुल, संदीप आणि सूरज अशी या नराधमांची नावे आहेत. या घटनेने पुन्हा एकदा निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण घडल्याचे या निमित्ताने पुढे आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.