10

भाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश यांचा राजीनामा - लालूप्रसाद

 बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा शाधलाय. भाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश कुमारांनी राजीनामा दिला, असा थेट हल्लाबोल लालूप्रसाद यांनी केलाय.

विमानांमध्ये हिंदी मासिक, वर्तमानपत्रे ठेवणे बंधनकारक

तुम्ही विमानाने प्रवास करत असताना नेहमीच इंग्रजी मासिके, वर्तमानपत्र हातात पडतात. मात्र, यापुढे आता तुमच्या हातात किंवा वाचायला हिंदी मासिके आणि वर्तमानपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

गुजरात-राजस्थानला पुराचा वेढा, पंतप्रधानांकडून पाहणी

 गुजरात आणि राजस्थानच्या काही भागाला पुराचा वेढा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची करणार हवाई पाहाणी केली. तर बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गुजरातमध्ये ७ हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेय.

टीम कोहलीसोबत राहुल द्रविड परदेश दौऱ्यांवर जाणार नाही!

 टीम इंडियासोबत बॅटिंग सल्लागार राहुल द्रविड जाणार नसल्याचे स्पष्ट झालेय. टीम कोहली आगामी श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. टीम कोहलीसोबत द्रविड जाणार नसल्याचे स्पष्टकरण प्रशासकीय समिती प्रमुख विनोद राय यांनी दिलेय.

महिला क्रिकेट टीमवर बक्षिसांचा वर्षावर, प्रत्येक खेळाडूला ५० लाख

महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या भारतीय टीमला बीसीसीआयनं बक्षिसाची घोषणा केली आहे. 

आधार कार्ड सक्ती सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाचे हे निरीक्षण

खासगी आयुष्यचा हक्क अनिर्बंध हक्क असू शकत नाही. आणि त्यावर निर्बंध घालण्याचे हक्क सरकारला आहेत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. आधार कार्ड सक्तीविरोधात न्यायालयाने हे निरीक्षण नोंदलेय.

रामनाथ कोविंद यांचा विजय, देशाचे १४ वे राष्ट्रपती

 देशाचे १४ वे राष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झालेत. त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.

पाकिस्तान दहशतवाद्यांच्या यादीत, भारताला मोठे यश

अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. दहशतवाद्यांना आश्रय देणारे देश आणि प्रदेशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तानच्या नावाचा समावेश केलाय. ही बाब भारतासाठी आनंदाची आहे.

क्रिकेटच्या नव्या नियमामुळे धोनी, गेल आणि वॉर्नरला बसणार असा फटका

क्रिकेटच्या नव्या नियमांचा फटका टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बसणार आहे. 

आता देशात केवळ १२ बँका, या बँकांचे होणार विलीनीकरण?

सार्वजनिक बॅंकांच्या विलीनीकरणाचा विचार पुढे आलाय. भारतीय स्टेट बॅंकेच्या धर्तीवर सार्वजनिक क्षेत्रात केवळ १२ मोठ्या बॅंकांना ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरु आहे. तशी चाचपणी होत आहे.