10
10
पाकिस्तानातील राजकीय पक्ष 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय)चे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खानवर त्यांच्याच पक्षातील एका महिला नेत्यानं गंभीर आरोप केलाय. इम्रान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात, असे सांगून राजकीय भूकंप केलाय.
गुजरात काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा टाकण्यात आलाय.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि आपल्या वाचळपणा बद्दल प्रसिद्ध असणारे दिग्विजय सिंह यांचे पक्षातील अधिकारांचे पंख छाटण्यात आलेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरु असलेल्या बचाव आणि पुनर्वनस कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच ते गुवाहाटीला रवाना झाले.
बिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात २७ मंत्र्यांनी शपथ घेतली.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानी सर्वोच्च न्यायायालनं जोरदार दणका दिलाय. पनामा गेट प्रकरणी झालेल्या सुनावणीत कोर्टानं नवाज शरीफ यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळ त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. न्यायालयाच्या दणकेनंतर विरोधी पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान याने जोरदार हल्लाबोल केलाय.
पाटणा : बिहारमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जदयू आणि भाजपला १२२ मतांची गरज होती.
नितीश कुमार यांच्या नव्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये भाजपच्या १४ जणांना त्यात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
५०व्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर आश्विन याने सोमवारी गॉल मैदानावर पाऊल ठेवल्यानंतर त्याच्यासाठी गुडन्यूज मिळाली. अश्विनने या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २०१५ मध्ये १० विकेट घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि त्याच्यासाठी ही संधी शुभ ठरली. या मैदानावर पहिल्या सामन्यात पहिल्या डावात अश्विनने आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.
मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बनासकांठा, पाटण या आणि इतर भागांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये आतापर्यंत १२३ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
तामिळनाडू राज्यातील एका १० जणांच्या टोळीने मध्यप्रदेश आणि उत्तरखंडमध्ये हातचलाखी करत एटीएमचे तब्बल ८५ लाख लुटले. मात्र सिसिटीव्हीत कॅमेराबंद झालेले आरोपी थेट शिर्डीत जेरबंद झालेत.