पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात महिला ठार

पाकिस्तानकडून सीमाभागात पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलेय. पाक गोळीबारात एक ४५ वर्षीय महिला ठार झाली. मेंढर सेक्टर येथे पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 12, 2017, 09:39 AM IST
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात महिला ठार title=

कुपवाडा, जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून सीमाभागात पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलेय. पाक गोळीबारात एक ४५ वर्षीय महिला ठार झाली. मेंढर सेक्टर येथे पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.

पाकिस्तानकडून मेंढर परिसरात बेछूट गोळीबार करण्यात आला. तसेच रात्री कुपवाडा जिल्ह्यातल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यात लष्कराचा एक जवान जखमी झाल्याचं वृत्त हाती आलेय. पाकिस्तानकडून पहाटे करणयात आलेल्या गोळीबार आणि ग्रेनेड हल्ल्यात एक महिला ठार झाली. या हल्ल्यात काही घरांचे नुकसान झाले 

दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीरच्या कलारूस कुपवाडा जिल्ह्यातील वनक्षेत्रात ४२ राष्ट्रीय रायफल्स (आरआर) मुख्यालयावर हल्ला केला. या लष्करी तळावरील हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलेय. यात एक जवान जखमी झाला आहे.

दरम्यान, लष्कराकडून त्राल भागात पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात आलेय. त्याआधी मंगळवारी जम्मूच्या पूँछ भागातील कृष्णा खोऱ्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या भारतीय जवान शहीद झाला होता.