नवी दिल्ली : राज्यसभेचा १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष लागले आहे ते गुजरातकडे. काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना मी काँग्रेसला मतदान केलेले नाही. कारण त्यांना ४० मतेही मिळणार नाही, पटेल यांचा पराभव अटळ आहे, असा गौप्यस्फोट शंकरसिंग वाघेला यांनी करत त्यांनी काँग्रेसला जोरदार हादरा दिला. शिवाय याचे मला दु:ख नाही, असेही ते म्हणालेत.
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. पहिल्या दोन जागांसाठी भाजपकडून अमित शाह, स्मृती इराणी रिंगणात आहेत. या दोघांचा विजय निश्चित आहे. तर तिसऱ्या जागेसाठी सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि भाजपचे बलवंतसिंह राजपूत यांच्यात लढत आहे. या निवडणुकीत शंकरसिंग वाघेला हे किंगमेकर ठरणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस नेतृत्वार प्रश्न उपस्थित केले होते. राज्यसभा निवडणुकीत वाघेला आणि त्यांचे समर्थक आमदार कोणाच्या बाजूने मतदान करणार याविषयी उत्सुकता आहे. मात्र, विधीमंडळात मतदान केल्यानंतर शंकरसिंग वाघेला यांनी काँग्रेसला मत दिले नाही असे जाहीर केले.
Jab Cong jeetne waali hai hi nahi, vote bina matlab Cong ko dene ka matlab nahi tha. Humne Ahmed Patel ko vote nahi diya:Shankersinh Vaghela pic.twitter.com/LoQZES57K3
— ANI (@ANI_news) August 8, 2017
काँग्रेसचा पराभव होणार हे आधीपासूनच माहीत आहे. मग त्यांना मत देऊन उपयोग काय?, असा प्रश्न वाघेला यांनी उपस्थित केलाय. निवडणुकीच्या आधीच मी काँग्रेस नेतृत्वाला याची कल्पना दिली होती. पण त्यांनी माझे म्हणणे ऐकूनच घेतले नाही. त्यामुळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणालेत.
काँग्रेसचे ४४ आमदार पटेल यांना मतदान करतील याची खात्री नाही. यात क्रॉस व्होटींगही होऊ शकते, असे सूचक विधानही त्यांनी केले. वाघेला यांनी भाजपला मतदान केले की 'नोटा'चा वापर केला यावर त्यांनी मौन बाळगले.