10

अमरनाथ भाविकांवर हल्ला : सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर अटकेत

अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांच्या बसवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर ताब्यात घेतला आहे. तौसिफ अहमद असे त्याचे नाव आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. भारतीय जवान आणि जम्मू पोलिसांची संयुक्त कारवाई केली.  

उत्तर प्रदेश विधानसभा स्फोटकांची NIA मार्फत चौकशी

 उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके (PETN) सापडल्याने मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर NIA चौकशीची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी ही मागणी मान्य केलेय.  

गुडन्यूज : स्टेट बॅंकेने या शुल्कात केली ७५ टक्के कपात, उद्यापासून मिळणार फायदा

तुमचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेत खाते असेल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. एसबीआयने इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे (आयएमपीएस) एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठविण्यासाठी लागणारे शुल्क रद्द केले आहे. त्याचबरोबर ७५ टक्के शुल्क कपात केलेय. याचा लाभ हा उद्यापासून मिळणार आहे.

स्फोटके सापडल्याने उत्तर प्रदेश विधानसभेची सुरक्षा वाढवली

 उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा सुरक्षेतील मोठी उणीव उघड झालेय.  

'भारत बनवित आहे असे आण्विक क्षेपणास्त्र की संपूर्ण चीन नष्ट होऊ शकतो'

भारत चीनचा वाढता धोका लक्षात घेऊन आण्विक क्षेपणास्त्रावर भर देत आहे. अत्याधुनिक आण्विक क्षेपणास्त्र बनविण्याची रणनीती भारताने आखली आहे.  तसेच पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरी होत आहे. त्यामुळे चोक प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने लक्ष केंद्रीत केलेय. आता तर चीनकडे भारताने विशेष लक्ष केंद्रीत केलेय, अशी माहिती अमेरिकेतील दोन वरिष्ठ आण्विक क्षेपणास्त्र अभ्यासकांनी दिलेय.

आसाम पुराच्या पाण्यात, १७ लाख नागरिक बाधित

आसामधली ब्रह्मपुत्रा नदीची पूरस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. दिवसभरात पुराच्या पाण्यात आणखी ५ जणं वाहून गेले. 

मोठा हिमनग अंटार्टिकाच्या समुद्रातून विलग, समुद्राच्या पातळीत वाढीचा धोका

मुंबईच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास नऊ पट मोठा हिमनग अंटार्टिकाच्या समुद्रातून विलग झालाय. यामुळे दक्षिण ध्रुवीय परिसरात असणाऱ्या समुद्राच्या पातळीत मोठा बदल होण्याची भीती व्यक्त होतेय. 

आंतरराष्ट्रीय बातम्या एका क्लिकवर पाहा

 विमान दुर्घटनाग्रस्त, १६ जणांचा मृत्यू 

वॉशिंग्टन : अमेरिकेत एक सैनिकी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला.

अमेरिकेत एक सैनिकी विमान दुर्घटनाग्रस्त झालंय. हे विमान उड्डाण केल्यानंतर रडारवरून गायब झालं होतं. त्यानंतर विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळाली. 

अमरनाथ हल्ल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन, ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरच्या हल्ल्यानंतर फरार झालेल्या दहशतावाद्यांचा शोध संपूर्ण काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलाय. लष्कर आणि पोलिसांनी सुरू केलेल्या कोम्बिंगऑपरेशनमध्ये बडगाम जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.